लॉकडाऊन नव्हे कडक निर्बंंध; ग्रामीण भागातील दुकाने शनिवारी अन् रविवारी बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 06:33 PM2021-03-25T18:33:38+5:302021-03-25T18:33:55+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Strict restrictions not lockdown; Shops in rural areas will be closed on Saturdays and Sundays | लॉकडाऊन नव्हे कडक निर्बंंध; ग्रामीण भागातील दुकाने शनिवारी अन् रविवारी बंद राहणार

लॉकडाऊन नव्हे कडक निर्बंंध; ग्रामीण भागातील दुकाने शनिवारी अन् रविवारी बंद राहणार

googlenewsNext

सोलापूर - कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी सायंकाळच्या सुमारास सुधारित आदेश काढला आहे. सोलापूर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून ग्रामीण भागासाठी हा आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या या सुधारित आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या वेळेत चालू राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे व बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात आले आहेत. खाद्यगृह, परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत कोव्हिडच्या नियमांचे पालन करून 50 टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशातून अत्यावश्‍यक सेवा/मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला व फळे, किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना या आदेशातून सुट देण्यात आली आहे. होम डिलिव्हरीसाठी किचन व वितरण कक्ष रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम, व्यायाम शाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्याकडे लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार नियोजन करावे. एका दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता शेत मालाच्या प्रकारानुसार लिलावाचा दिवस व वेळ विभागून द्यावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. बाजार समित्यांमधील लिलावाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपविण्यात आली आहे.

 

Web Title: Strict restrictions not lockdown; Shops in rural areas will be closed on Saturdays and Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.