थांबलेली बस अचानक सुरु झाली अन् शौचाला बसलेल्या महिलेच्या पायावरून चाक गेलं, कुर्डूवाडीजवळ अपघात

By विलास जळकोटकर | Updated: June 26, 2023 17:48 IST2023-06-26T17:48:39+5:302023-06-26T17:48:57+5:30

सोलापूर : बस थांबली म्हणून एक महिला बसमागे शौचास गेली होती. मात्र अचानकपणे बस मागे आल्याने बसचे चाक त्या ...

Stopped bus suddenly starts and wheel runs over woman leg sitting on toilet, accident near Kurduwadi | थांबलेली बस अचानक सुरु झाली अन् शौचाला बसलेल्या महिलेच्या पायावरून चाक गेलं, कुर्डूवाडीजवळ अपघात

प्रतिकात्मक फोटो

सोलापूर : बस थांबली म्हणून एक महिला बसमागे शौचास गेली होती. मात्र अचानकपणे बस मागे आल्याने बसचे चाक त्या महिलेच्या पायावरून गेल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कुर्डूवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. अनुबाई जानबाजी राखडे (वय- ५०, पाचगाव, ता. तिमूर, जि. चंद्रपूर) असे जखमी महिलेचे नाव आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने यातील जखमी अनुबाई या नागपूर- पंढरपूर बसमधून पंढरपूरकडे चालल्या होत्या. ही बस रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कुर्डूवाडीपासून अलिकडे तीन-चार कि. मी. अंतरावर थांबली होती. यादरम्यान महिला बाथरुमसाठी (शौचाला) म्हणून खाली उतरल्या. चालकाला माहिती नसल्याने त्याने अचानक बस मागे घेतली. यामुळे सदर महिलेच्या डाव्या पायावरुन चाक गेल्याने ती जखमी झाली आहे.

पंढरपुरात पोहचताच तेथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दीर महादेव राकडे यांनी दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
 

Web Title: Stopped bus suddenly starts and wheel runs over woman leg sitting on toilet, accident near Kurduwadi