शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट दरवाढीच्या विरोधात रेल रोको

By admin | Updated: June 26, 2014 01:30 IST

शहर-जिल्हा काँग्रेस : चेन्नई एक्स्प्रेस अडवली

सोलापूर : केंद्र शासनाने रेल्वे तिकिटात दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीने रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी चेन्नई एक्स्प्रेस अडवून जोरदार घोषणाबाजी केली. रेल्वे मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी १४.५ टक्के तिकीट दरवाढ केली. मालवाहतुकीच्या दरात ६ टक्के दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईत तिकीट दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत असल्यामुळे शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वा. सोलापूर रेल्वेस्थानकावर चेन्नई एक्स्प्रेस अडवण्यात आली. केंद्र शासनाचा धिक्कार करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विजापूर पॅसेंजर गाडीसमोरही जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी थोड्यावेळासाठी रेल रोको आंदोलन केले. शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहर महिलाध्यक्ष ज्योती वाघमारे, नगरसेविका सुशीला आबुटे, श्रीदेवी फुलारी, जगदेवी नवले, सुभाष चव्हाण, सुमन जाधव, इ ब्लॉक अध्यक्षा संध्या काळे, प्रा. संघमित्रा चौधरी, नंदा कानडे, अरुणा बेंजरपे, सातलिंग शटगार, आजमल शेख, फिरोज कामतीकर, जावेद कांबळे, रामचंद्र कुलकर्णी, एन.एस.यु.आय. शहराध्यक्ष गणेश डोंगरे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अच्छे दिन आयेंगे अशा वल्गना करीत भारतीय जनता पार्टीने केंद्रात सत्ता मिळवली; मात्र पहिल्याच महिन्यात सर्वसामान्यांना धक्का देणारी भाडेवाढ करून ठेवली आहे. दिलेली आश्वासने तर लांबच उलट जनतेला वेठीस धरण्याचे धोरण केंद्र शासनाने अवलंबले आहे. शासनाने दरवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन घेऊ आणि रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी दिला. -----------------------------प्रवाशांना पाणी वाटप...आंदोलनादरम्यान प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले. सनदशीर मार्गाने करण्यात आलेल्या आंदोलनात गोंधळ उडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. -------------------------नगरसेविका पडल्या...रेल रोको करण्यासाठी सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते रेल्वे रुळावर उतरले होते. हे आंदोलन सुरू असताना अचानक रुळावर नगरसेविका सुशीला आबुटे या पाय घसरुन पडल्या आणि त्यांना मार लागला.