राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटलांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

By Appasaheb.patil | Updated: October 4, 2022 14:51 IST2022-10-04T14:51:27+5:302022-10-04T14:51:33+5:30

सोलापूर :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच उच्च ...

State Cabinet Ministers Radhakrishna Vikhe Patil, Chandrakant Patal took darshan of Vitthal | राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटलांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटलांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री  चंद्रकांत पाटील  यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर  यांच्याहस्ते शाल व  श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, राम सातपुते, राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच मान्यवर, पदाधिकारी  उपस्थित होते.

Web Title: State Cabinet Ministers Radhakrishna Vikhe Patil, Chandrakant Patal took darshan of Vitthal