शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीने दिली भरगच्च विषयांना मंजुरी

By admin | Updated: June 27, 2014 01:06 IST

जिल्हा परिषद: मालमत्तेचा अहवाल महिनाभरात देण्याच्या सूचना

सोलापूर: तीन महिन्यानंतर झालेल्या स्थायी सभेत आयत्या वेळच्या २६ विषयाला मंजुरी देण्यात आली. वैयक्तिक लाभाच्या योजनांची खरेदी व व्यापारी गाळे बांधकामाच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला व महिनाभरात त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभा गुरुवारी झाली.२९ मार्च, २८ एप्रिल, २६ मे नंतर २३ जून रोजीची स्थायी सभा तहकूब व आचारसंहितेुळे गुंडाळाव्या लागल्या होत्या.२३ जूनची बैठक अधिकारी नसल्याने तहकूब करावी लागली होती. ती बैठक गुरुवारी झाली. समाजकल्याण खात्याच्या पाईप खरेदी ३५ लाख, सायकल ४० लाख, स्प्रींकलर सेट ३५ लाख, पल्व्हरायझर मशिन खरेदी ३५ लाख, कडबाकुट्टी खरेदी ३५ लाख, लॅपटॉप पुरविणे ४५ लाख रुपयाला मंजुरी देण्यात आली. कृषी खात्याच्या ताडपत्री खरेदी २० लाख थ्रिपिस्टन खरेदी २५ लाख, डबल पिस्टर खरेदी २३ लाख रुपयाला मान्यता दिली. महिला व बालकल्याण खात्याच्या पल्व्हरायझरसाठी ४५ लाख, गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहार पुरविण्यासाठी ३१ लाख, मुलींसाठी सायकल पुरविण्यासाठी ४० लाख, मुलींसाठी एम.एस.सी.आय.टी. चे प्रशिक्षण देण्यासाठी २५ लाख, महिला व मुलींना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी ४० लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा विषय दोन वर्षांपासून चर्चीला जात असला तरी ताळमेळाचा अंतिम अहवाल येत नव्हता. गुरुवारी झालेल्या बैठकीत महिनाभरात मालमत्तेचा अहवाल देण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या. ---------------------------------व्यापारी गाळे बांधकामाला मंजुरीजिल्हा ग्रामनिधीतून व्यापारी गाळे बांधकामासाठी मंगळवेढा तालुक्यातील मरवडेसाठी २८ लाख ७४ हजार, मोहोळ तालुक्यातील औंढीसाठी १४ लाख २८ हजार रुपये, करमाळा तालुक्यातील पारे येथे १६ लाख ५० हजार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे १३ लाख ७७ हजार, दर्गनहळ्ळी येथे ४ लाख ९८ हजार २० रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.----------------------------शिल्लक ठेवीची मुदत वाढवलीजिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे असलेल्या ग्रामनिधीची रक्कम ग्रामपंचायतींना कर्ज म्हणून दिली जाते. अलीकडे ग्रामपंचायतींकडून कर्ज मागणीचे अधिक प्रस्ताव येत नसल्याने ही रक्कम शिल्लक राहत आहे. त्यामुळे ही रक्कम ठेवीच्या स्वरुपात बँकेत ठेवली जाते. जिल्हा बँकेत असलेल्या ठेवीची मुदत २९ जून रोजी संपत असल्याने कर्ज वाटपासाठी ५९ लाख ५६ हजार १०१ रुपये शिल्लक ठेवून उर्वरित १ कोटी १० लाख रुपयाला मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.