कर्नाटक पोलिसांनी दिले सिग्नल; सोलापुरातून धावल्या एसटी गाड्या

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 29, 2022 19:27 IST2022-11-29T19:26:43+5:302022-11-29T19:27:13+5:30

कर्नाटक पोलिसांनी सिग्नल दिल्यानंतर सोलापुरातून एसटी गाड्या धावल्या. 

 ST trains ran from Solapur after the Karnataka Police gave a signal | कर्नाटक पोलिसांनी दिले सिग्नल; सोलापुरातून धावल्या एसटी गाड्या

कर्नाटक पोलिसांनी दिले सिग्नल; सोलापुरातून धावल्या एसटी गाड्या

सोलापूर : पाच दिवसांपासून सोलापूरकर्नाटक सीमावर्ती भागात तणाव होता. सीमावाद उफाळून आल्याने एसटी गाड्यांचा मार्ग राेखला गेला. आता तणाव काहीसा निवळला असून, मंगळवार पासून पुन्हा एसटी गाड्यांचा मार्ग पूर्ववत करण्यात आला आहे. कर्नाटकपोलिसांकडून सिग्नल मिळाल्यानंतर सोलापुरातून मंगळवारी साठ गाड्या कर्नाटककडे धावल्या. पाच दिवसानंतर प्रवाशांची गैरसोय थांबली आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

तणाव निवळल्यानंतर सोमवारी प्रथम विजयपूरकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग खुला झाला. त्यानंतर मंगळवारी अक्कलकोटमधून कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग खुला झाला. दोन्ही सीमावर्ती भागात शांतता असून कोणतेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच बसमध्ये प्रवाशांची चांगली गर्दी होती.

 

 

Web Title:  ST trains ran from Solapur after the Karnataka Police gave a signal