शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या विधी सल्लागारास लाच घेताना अटक

By admin | Updated: June 26, 2014 01:23 IST

कामगार न्यायालय आवारात झाली कारवाई

सोलापूर : बडतर्फीच्या खटल्यात बाजूने निकाल लावण्यासाठी वाहकाकडून चार हजारांची लाच घेताना राज्य परिवहन महामंडळाचे कायदेशीर सल्लागार दिलीप पंढरीनाथ मराठे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी कामगार न्यायालयाच्या आवारात रंगेहाथ पकडले. पंढरपूर आगारातील वाहक समाधान पांढरे यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरून चौकशी होऊन राज्य परिवहन महामंडळाने त्यांना १२ सप्टेंबर २०१३ रोजी बडतर्फीची नोटीस दिली होती. या कारवाईविरुद्ध पांढरे यांनी कामगार न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने याची दखल घेत राज्य परिवहन महामंडळास ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे ते कामावर हजर होते. सुनावणी लांबविण्यासाठी परिवहनचे विधी सल्लागार मराठे यांनी पांढरे यांना लाच मागितली. तडजोडीने चार हजार देण्याचे ठरले. याबाबत पांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. आज सुनावणीची तारीख होती. याकामी दोघेही कामगार न्यायालयात आले होते. पोलिसांनी विधिज्ञ कक्षाजवळ सापळा लावला. दुपारी पांढरे यांच्याकडून लाच स्वीकारल्यावर पोलिसांनी अ‍ॅड. मराठे यांना रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असेल तर ९४०४६६३६९७ किंवा २३१२६६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.