सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी श्रीनिवास करली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:16 IST2019-08-09T12:08:33+5:302019-08-09T12:16:30+5:30

संजय कोळी यांचा कालावधी संपल्याने नव्या नेत्याची झाली निवड

Srinivas appointed as the Municipal Auditor General of Solapur | सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी श्रीनिवास करली

सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी श्रीनिवास करली

ठळक मुद्दे- निवडीनंतर श्रीनिवास करली यांचा झाला सत्कार- महापालिकेत करली गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष- करली यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या  सभागृह नेतेपदी सहकारमंत्री गटाचे नगरसेवक श्रीनिवास करली यांची शुक्रवारी निवड करण्यात आली.

सभागृह नेते संजय कोळी यांचा कालावधी संपल्याने नव्या नेत्याची निवड करण्यात आली. भाजपाचे शहर सरचिटणीस शशिकांत थोरात यांनी करली यांच्या नावाची घोषणा केली. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तूल, मावळते सभागृहनेते संजय कोळी, भाजयुमोच्या शहराध्यक्ष वृषाली चालुक्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करली यांचा सत्कार करण्यात आला. करली यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे.

Web Title: Srinivas appointed as the Municipal Auditor General of Solapur