शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

वैराग नगरपंचायतीसाठी शासकीय स्तरावर हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST

वैराग : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या असणाऱ्या वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाकडून ...

वैराग : जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या असणाऱ्या वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाकडून पत्राद्वारे तत्काळ माहिती मागविली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वैराग (ता. बार्शी) ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ७ फेब्रुवारी २०२० रोजी शासनाच्या नगरविकास विभागास पाठविण्यात आला होता. त्यावरून वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी मंत्रालय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.

नगरविकास विभागाकडून आलेल्या पत्रात पाठवलेल्या प्रस्तावाचे अवलोकन करून प्रस्तावासोबत अनुसूची-अ मध्ये प्रस्तावित नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्याचे क्षेत्र, सर्व्हे क्रमांकाची यादी व अनुसूची-ब संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील याबाबतची सविस्तर माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनाने शासनास तत्काळ सादर करावी, असे पत्रात म्हटले आहे. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी वैराग ग्रामपंचायतीला संबंधित कागदपत्रांची तत्काळ पूर्तता करण्याचा आदेश दिला आहे.

तत्पुर्वी राष्ट्वादीचे नेते निरंजन भुमकर यांनी माजी ग्रामविकास विभागाकडे २६ जानेवारी २०१९ रोजी वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची विनंती केली होती. दरम्यान राज्यातील सत्तातरानंतर राष्ट्रवादीचे मुख शरद पवार, उपमुखमंत्री अजित पवार, पालकमंत्री भरणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच शासनस्तरावर वैराग ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे निरंजन भुमकर यांनी सांगितले.

----