शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सोपल देवदर्शनाला तर बबनदादा गावाला..राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दिग्गजांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:56 IST

विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सोलापुरात अजित पवार यांनी घेतल्या मुलाखती

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आल्यानिवडणुकीच्या तोंडावर बरेच लोक या पक्षातून त्या पक्षात जात आहेत - अजित पवार

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या मुलाखतींना बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी दांडी मारली. दिलीप सोपल श्रीशैल येथे दर्शनाला गेल्याचे अजित पवार यांनी सांगितले. बबनदादा का आले नाहीत हे त्यांना विचारु. करमाळ्यातून संजय शिंदे इच्छुक असले तरी चार भिंतींच्या आड बसून निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती  येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आल्या. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर बरेच लोक या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. काही लोकांना कारखान्यासाठी ५० कोटी पाहिजेत, कुणाला ६० कोटी पाहिजेत. सोलापूर जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे की काहींच्या पतसंस्थांची चौकशी सुरू आहे. काहींनी एफआरपी दिलेली नाही.

काहींच्या कुक्कुटपालन संस्थेत तर काहींच्या दूध संघात गडबडी आहेत. काहींचे हात चौकशीत अडकले आहेत, अशी टीकाही पवार यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता केली. सत्ताधारी पक्षात राहिले की अधिकारी या चौकशा करण्याचे धाडस करीत नाहीत. अधिकारी सरकारच्या अधिपत्याखाली काम करतात. आपली गडचिरोलीला बदली होईल, शुक्लकाष्ट लागेल असे समजून अधिकारी काही करीत नाहीत. म्हणून पक्षांतर सुरू आहे. काही लोकांना आपले तिकीट कापले जाईल का याचे भय वाढीला लागले आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

मोहोळमधून स्थानिकाला संधी द्या : पाटील- मुलाखतीवेळी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, बाळराजे पाटील, संकेत ढवळे आदी उपस्थित होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुक असले तरी स्थानिक माणसाला उमेदवारी मिळावी यासाठी आमचा आग्रह असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपलBabanrao Shindeबबनराव शिंदेAjit Pawarअजित पवार