शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

धरतीने हिरवा शालू पांघरताच रंगीबेरंगी रानफुलांनी बहरली गावोगावची माळरानं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 8:35 AM

वन महोत्सव विशेष; उजनी काठ परिसरात असलेल्या करमाळा तालुक्यातील चित्र...

अक्षय आखाडे

जेऊर : गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या मृगाच्या पावसाने जिह्यातील बहुतांश माळरानात आता आत्ता हिरवी चादर पसरली आहे. परिणामी कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाल्याने माळरानावर असलेली विवध रान फुले फुलली असल्याने माळरानावर वेगळाच बहर आल्याचं चित्र दिसत आहे.

रंगीबेरंगी फुललेली ही फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रस्त्याच्या कडेचा मोकळ्या जागा, माळरानावर असलेल्या वगळी, नाले, पडीक शेते, शेताचे बांध इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात विविधरंगी फुले फुलली आहेत. असंख्य वर्षायू वनस्पतीं रुजण्यासाठी आणि आपलं वंश पुढे टिकून रहावा यासाठी च ही सगळी धडपड. फुलोऱ्यात आलेल्या रानफुलांचा मध मिळवण्यासाठी मधमाश्याची सुद्धा धावपळ सुरू आहे. असंख्य किडे फुलपाखरे मुंग्या यांचा या गवताच्या आधारावर आपलाही वंश टिकवण्याचा अट्टाहास करताना दिसताहेत. दवबिंदूची दुलयी पांघरलेली हिरव्या कुरूनावर शिंपल्यासारखी दिसणारी ही रंगीबेरंगी रानफुले मुक्त चैतन्य पेरण्याचे काम करताना दिसत आहेत.

रानफुलांच्या आढळणाऱ्या वनस्पती पुढीलप्रमाणे

केनपट, दुरंगी बाभळी,  टणटणी अथवा घाणेरी, ईचका, तरवड, सापकांदा, हसपळ, उरुळी,  कुर्मुडी, गुलाबी उन्हाळी, पांढर फळी, सराता, पुनर्नवा, कुर्डु, धोतरा,  कुळई, माकड शिंगी, पाथरी, भुई रिंगणी, गोधडी, काळमाशी रानभेडी, काचली, लाजाळू , बरबडा,  कललावी, छोटा कळपा, कोरांती, कतर्मेंदा, चांदवेल इत्यादी प्रकारच्या रानफुलांच्या वनस्पती आढळतात.

रानफुलाचे संवर्धन होणे गरजेचे

या वर्षी विविधरंगी रानफुले दिसत असली तरी दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून हे सगळंच कमी होताना दिसतंय. माळावरच्या मातीची धूप आणि वीटभट्टीसाठी लागणारी माती काढल्यामुळे  माळावरच्या मातीचा वरचा थरच गायब होतोय. आणि त्याबरोबरच त्यात सुप्तावस्थेत असलेल्या बिया ही नष्ट होऊन जाताहेत. निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या या रानफुलाचे संवर्धन करायलाच हवं.प्रतिक्रिया : पावसाळा आणि रानफुले यांचा अतूट संबंध आहे. आपल्याकडेही मृगाच्या पावसाबरोबर अनेक रानफुले माळावर, शेतात, उगवतात पावसाळा संपला की यांची पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागते.पण अलीकडे अनेक कारणांमुळे रानफुले आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत.त्याच संवर्धन होणे गरजेचे आहे.- विकास काळे  केतूररानभाज्या, रानफुलाचे अभ्यासक

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीUjine Damउजनी धरण