वृध्द पित्याचा मृतदेह काढताच 'तुमचे लय हाल झाले ओ दादा' म्हणत मुलाने हंबरडा फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:09 PM2020-09-14T13:09:07+5:302020-09-14T13:11:22+5:30

२४ तासानंतर विहिरीतून काढला मृतदेह; अग्निशामक दलाच्या पथकाला यश

As soon as the body of the old father was removed, your rhythm changed. Saying O Dada, the boy broke the humbarda. | वृध्द पित्याचा मृतदेह काढताच 'तुमचे लय हाल झाले ओ दादा' म्हणत मुलाने हंबरडा फोडला

वृध्द पित्याचा मृतदेह काढताच 'तुमचे लय हाल झाले ओ दादा' म्हणत मुलाने हंबरडा फोडला

Next
ठळक मुद्देपाण्यातून मृतदेह बाहेर काढलेला पाहून मुलगा महादेव डोलारे यांनी हंबरडा फोडलामृतदेह बाहेर काढताना काही जण फोटो काढत होते काहीजण शूटिंग करीत होते़ अनेकजण येथील भावनिक दृश्य पाहून हळहळ

वडाळा : अखेर अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांना विहिरीतील देविदास डोलारे यांचा मृतदेह काढण्यात यश आले़ मृतदेह बाहेर काढताच ‘दादा, तुम्हाला पोहता येत असतानाही तुम्ही असे कसे पाण्यात बुडालात, तुमचे लय हाल झाले ओ दादा़...’ असे म्हणत मुलगा महादेव डोलारे याने आक्रोश करीत हंबरडा फोडला़ येथील भावनिक दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

१२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सोलापूर-बार्शी रोडलगत  असलेल्या शेतातील विहिरीमध्ये देविदास डोलारे हे नातवाला बरोबर घेऊन पोहण्यासाठी गेले होते़ तेव्हा पोहता येत असतानाही पँटीत पाय अडकून त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत्यूदेह काढण्यासाठी गावातील नागरिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले़ पण त्यांना यश आले नाही.

रविवारी सकाळी माजी सरपंच सुधीर कांबळे यांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांना पाचारण केले़ अग्निशामक दलाचे कर्मचारी अच्युत दुधाळ, नीलेश माने, बाबुलाल नदाफ, स्वप्निल कांबळे, भीमाशंकर बिराजदार यांनी लोखंडी गळाच्या साहायाने मृतदेह बाहेर काढला.

पाण्यातून मृतदेह बाहेर काढलेला पाहून मुलगा महादेव डोलारे यांनी हंबरडा फोडला. यावेळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. मृतदेह बाहेर काढताना काही जण फोटो काढत होते तर काहीजण शूटिंग करीत होते़ अनेकजण येथील भावनिक दृश्य पाहून हळहळ व्यक्त करीत होते.

Web Title: As soon as the body of the old father was removed, your rhythm changed. Saying O Dada, the boy broke the humbarda.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.