शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

सोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 8:33 AM

दोघे एकाच महाविद्यालयातील : मार्डीत दाखवित होते लोकेशन

ठळक मुद्दे- पालकमंत्र्यांनी केले संयुक्ताच्या कुटुंबियांचे सांत्वन- सोलापूर तालुका पोलीसांचा वेगाने तपास सुरू- विषबाधेने मृत्यू झाल्याची माहिती समोर

सोलापूर : अकोलेकाटी - मार्डी रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आलेल्या संयुक्ता भैरी या महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू विष प्राशनामुळे झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात आज स्पष्ट झाले; मात्र ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबतच्या चर्चेला पोलीस तपास तपासांतीच पूर्णविराम मिळणार आहे. दरम्यान, संयुक्ताच्या मृत्यूचा आणि सोमनाथ तरळनाळकर या युवकाच्या आत्महत्येशी कोणता संबध आहे का? याचाही तपास पोलीस करीत आहेत.

संयुक्ता भैरी (वय २२, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर) हिच्या मृत्यूचा पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केल्यानंतर दयानंद महाविद्यालयातील सोमनाथ तरळनाळकर या युवकाने विजयपूर येथील गोलघुमटावरून उडी टाकून आत्महत्त्या केल्याची माहिती पुढे आली. त्यावरून या दोन्ही घटनांचा संबंध पोलिसांकडून तपासून पाहिला जात आहे. 

संयुक्ताचा ज्या ठिकाणी मृतदेह आढळला; त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. चोवीस तास झाले तरी अद्याप तिची ओढणी आणि बॅग पोलिसांना सापडली नाही.  विशेष म्हणजे ओढणी व बॅगचा शोध पाच पोलीस आणि  वन विभागाच्या कर्मचाºयांकडून घेतला गेला; पण मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या वस्तू सापडल्या नाहीत. मृत सोमनाथ याच्या दुचाकीचाही शोध लागला नाही. संयुक्ता हिने स्वत:हून विष पिले की तिला कोणी विष पाजले ? याचा शोध लागला नाही. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. संयुक्ताच्या  मित्र-मैत्रिणींकडे पोलिसांनी चौकशी केली. सोमनाथ तरनाळकर याने विजयपूर येथे जाऊन का आत्महत्या केली याचा शोध सुरू आहे.  संयुक्ता हिच्या पश्चात आई,वडील, एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. पद्मशाली समाज बांधवांनी  कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रणिती शिंदे, नगरसेवक देवेंद्र कोठे व प्रथमेश कोठे,सुरेश फलमारी, अशोक यनगंटी, लक्ष्मीनारायण आकेन, प्रवीण कारमपुरी, दशरथ गोप, श्रीनिवास रिकमल्ले यांनीही संयुक्तांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी