शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

सोलापूरच्या लोकअदालतीत ९७५ प्रकरणे तडजोडीने निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 5:32 PM

महाराष्टÑ विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणातर्फे  लोकअदालत पार पडली.

ठळक मुद्दे२८०७ प्रलंबित प्रकरणे व ६,५२१ दाखलपूर्व प्रकरणेलोकन्यायालयासाठी जिल्ह्यात एकूण ३१ पॅनलची सोय४ कोटी ९१ लाख ५१ हजार ६१७ एवढ्या रकमेची वसुली

सोलापूर:  सोलापूर जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शहर आणि जिल्ह्यातील न्यायालयात राष्टÑीय लोकअदालत पार पडली. यामध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ९,३२८ प्रकरणांपैकी ९७५ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. याशिवाय ४ कोटी ९१ लाख ५१ हजार ६१७ एवढ्या रकमेची वसुली झाली.

महाराष्टÑ विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणातर्फे  लोकअदालत पार पडली. यामध्ये २८०७ प्रलंबित प्रकरणे व ६,५२१ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ९,३२८ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ६०० प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली व ३७५ दाखलपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड झाली. 

या लोकन्यायालयासाठी जिल्ह्यात एकूण ३१ पॅनलची सोय करण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, भू-संपादन, दरखास्त व कलम १३८ चलनक्षम कायद्याची तसेच कौटुंबिक वाद आदी न्यायप्रविष्ठ प्रकरणे आणि बँका, टेलिफोन कंपनी, वीज महावितरण, महानगरपालिका, वित्तीय संस्था यांची दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. हे लोकन्यायालय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वकील संघटना व पक्षकार यांच्या सहकार्याने पार पडले. सोलापूर जिल्हा न्यायालयातील पॅनलवर न्यायाधीश डी.के. अनभुले, एस. एम. पाटील, यू. एल. जोशी, वाय. जी. देशमुख, आर. व्ही. सावंत-वाघुले, एस. व्ही. देशपांडे, न्यायिक अधिकाºयांनी काम पाहिले. यासाठी न्यायिक अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ, विधी संस्थांचे अधिकारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक दौलत सीताफळे, आर. व्ही. रंपुरे, अंबादास मच्छा, व्ही. एस. चिकमणी, ए. बी. शेख यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPoliceपोलिस