शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

सोलापूर शहरात सर्वत्र कचराच कचरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:47 PM

घंटागाड्यांचे नियोजन कोलमडले; आयुक्तांच्या बैठकीनंतरही परिणाम नाही

ठळक मुद्देकचरा संकलन करणाºया घंटागाड्या अनेक प्रभागात नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक करीत आहेतशहराच्या अनेक भागात उघड्यावर कचरा साचत असल्याचे पाहायला मिळत आहे

सोलापूर : महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी बैठक घेऊनही कचरा संकलन करणाºया घंटागाड्या अनेक प्रभागात नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक करीत आहेत. शहराच्या अनेक भागात उघड्यावर कचरा साचत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 महापालिकेच्या २२५ घंटागाड्या आहेत. या घंटागाड्यांवर काम करणाºया कर्मचाºयांचा पगार आणि पीएफ जमा न केल्याने अनेक कर्मचाºयांनी काम सोडले आहे. कर्मचारी संपावर गेले होते. नव्याने कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी घंटागाड्यांच्या फेºयांचे नियोजन बिघडल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सफाई विभागातील अधिकाºयांची बैठक घेतली.

घंटागाड्यांच्या नियोजनावर चर्चा करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आठ दिवस घंटागाड्याचे काम सुरळीत झाले होते. पण पुन्हा आठ दिवसांपासून अनेक भागात घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरातील शेळगी, भवानी पेठ, मधला मारुती परिसर, अशोक चौक, नई जिंदगी, जुळे सोलापुरातील काही प्रभागात लोक उघड्यावर कचरा टाकत आहेत. उघड्यावर कचरा टाकणाºयांविरुद्ध होणारी कारवाई थंडावली आहे. सात रस्ता ते रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन ते नवीवेस पोलीस चौकी, गुरुनानक चौक ते दयानंद कॉलेज चौक या प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा साठला आहे. 

नई जिंदगी परिसरातील घंटागाड्याचे नियोजन बिघडलेले आहे. तीन दिवसांतून एकदा गाडी येत आहे. आम्ही लोकांना रस्त्यावर कचरा टाकू नका म्हणून सांगतो. पण लोक ऐकत नाहीत. गाडी वेळेवर येत नसल्याने रस्त्यावर कचरा साठत आहे. - परवीन इनामदार, नगरसेविका

महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या काळात आमच्या प्रभागातील उकिरडे बंद झाले होते. कारण वेळेवर घंटागाड्या येत होत्या. आता घंटागाड्यांचे नियोजन बिघडले आहे. संभाजी चौक ते शिवाजी चौक या मार्गावरही लोक उघड्यावर कचरा टाकत आहेत. याबाबत आम्ही मुख्य सफाई अधीक्षकांकडे तक्रार करुनही सुधारणा झालेली नाही. - देवेंद्र कोठे, नगरसेवक

घंटागाड्यांचे नियोजन व्यवस्थित झाले आहे.  नगरसेवकांनी तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांना गाड्या उपलब्ध करून देऊ. - त्रिंबक ढेंगळे-पाटीलउपायुक्त, मनपा

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी