सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप व मित्र पक्षाचे वर्चस्व ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:22 IST2019-05-18T16:20:02+5:302019-05-18T16:22:53+5:30
पालकमंत्री विजयकुमार देशमुख याच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत मित्रपक्षांमधील नेत्यांचा निर्णय

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप व मित्र पक्षाचे वर्चस्व ठेवणार
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्याचे राजकीय समीकरणे बदलणार- सोलापूर जिल्हा परिषदेमधील विविध विषयावर झाली चर्चा- जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप नेते सरसावले
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने मित्रपक्षांची बैठक झाली़ या बैठकीचे ठिकाण अद्याप सांगण्यात येत नाही.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपाचे वर्चस्व कायम ठेवण्यावर विचारमंथन झाले़ यापूर्वी साथ देणारे अपक्ष राष्ट्रवादीत गेल्यामुळे शिवसेना व मोहिते - पाटील गटाच्या आधारावर वर्चस्व कायम ठेवण्याचे यावेळी ठरले़ लोकसभा निवडणुक निकालानंतर पुढील भूमिका घेण्यावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...