सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंचे ऑफिस फोडले; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

By Appasaheb.patil | Updated: September 11, 2023 17:15 IST2023-09-11T17:14:43+5:302023-09-11T17:15:33+5:30

आंदोलनाचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे

Solapur Zila Parishad CEO office broken then Protesters in police custody | सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंचे ऑफिस फोडले; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंचे ऑफिस फोडले; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोड आंदोलकांनी केली. हा प्रकार सोमवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. या दरम्यान, जिल्हा परिषदेचा सीईओ मनीषा आव्हाळे या विभाग सोमवारी दुपारी विभाग प्रमुखांच्या बैठका घेत होत्या, दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आंदोलन जिल्हा परिषदेत आले, काहीही कळण्याच्या सीईओ त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून कार्यालयातील खिडक्या व खुर्च्यांची तोडफोड केली. यावेळी अचानक गोंधळ उडाला. तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी नेमके कोणत्या कारणासाठी आंदोलन केले याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Solapur Zila Parishad CEO office broken then Protesters in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.