फडणवीस सरकारच्या निषेधार्थ सोलापूर युवक काँग्रेसचे ‘निषेधासन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:45 IST2018-10-31T17:41:45+5:302018-10-31T17:45:59+5:30
सोलापूर : खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहर युवक काँग्रेसतर्फे विविध ...

फडणवीस सरकारच्या निषेधार्थ सोलापूर युवक काँग्रेसचे ‘निषेधासन’
सोलापूर: खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहर युवक काँग्रेसतर्फे विविध योगाची आसने करून निषेध नोंदविण्यात आला.
प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व सोलापूरचे निरीक्षक सचिन पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेटवर बुधवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेली खोटी आश्वासने व सत्तेवर आल्यावर मात्र जनताविरोधी धोरणांचा निषेध म्हणून निषेधासन करण्यात आले. या अभिनव आंदोलनात सैफन शेख, विवेक कन्ना, योगेश मार्गम, राजासाब शेख, प्रवीण जाधव, तिरुपती परकीपंडला, गोविंद कांबळे, सुशीलकुमार म्हेत्रे, ओंकार गायकवाड, सुभाष वाघमारे, संतोष अट्टेलूर, सोहेल पठाण, सिद्राम आनंद, शरद गुमटे आदी सहभागी झाले.
फडणवीस सरकारच्या धोरणामुळे त्रस्त झालेल्या जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब विविध आसनांद्वारे दाखविण्यात आली. फडणवीस व केंद्रातील मोदी सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे जनतेत प्रक्षोभ आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी अभिषेक कटके, उमाकांत कोळी, गणेश गायकवाड, महेश लोंढे, संजय गायकवाड, खाजाभाई शेख, जावेद कुरेशी, असलम शेख, सिकंदर सय्यद, महंमद अली पटेल, श्रीनिवास परकीपंडला, ओंकार शिनगारे, जगदीश वासम, प्रवीण कदम यांनी परिश्रम घेतले.