दारुच्या नशेत 'त्या' तरुणाकडून काचेच्या बाटलीनं हात कापण्याचा प्रयत्न

By विलास जळकोटकर | Updated: June 17, 2024 18:48 IST2024-06-17T18:48:41+5:302024-06-17T18:48:50+5:30

रक्तबंबाळ अवस्थेत त्याला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Solapur young man tried to cut his hand with glass bottle while under the influence of alcohol | दारुच्या नशेत 'त्या' तरुणाकडून काचेच्या बाटलीनं हात कापण्याचा प्रयत्न

दारुच्या नशेत 'त्या' तरुणाकडून काचेच्या बाटलीनं हात कापण्याचा प्रयत्न

सोलापूर : मद्य प्राशन किती धोक्याचं आहे अन नशेत कोण काही करेल याचा नेम नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका तरुणानं नशेमध्ये काचेच्या फुटलेल्या बाटलीनं स्वत:चा हात कापून घेण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सोमवारी मध्यरातीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. परमेश्वर मोहन जाधव (वय २२, रा. कासेगाव, ता. द. सोलापूर) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. 

यातील जखमी तरुणाला दारुचे व्यसन आहे. नशेत आपण काय करतोय याचे त्याला भान नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. रविवारी रात्री त्याने नशापान केले होते. रात्री बारानंतर सोमवारी बारानंतर त्याने नशेमध्ये बडबडत फुटलेल्या बाटलीनं स्वत:च्या हात कापण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याचा हात रक्तबंबाळ झाला. या प्रकारानं जागी झालेल्या नातलग घाबरले. तशाच अवस्थेत त्याचा मित्र ऋषिकेश याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. तो शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Solapur young man tried to cut his hand with glass bottle while under the influence of alcohol