Solapur: मालवंडीत वृद्धेच्या खून प्रकरणात दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी

By दिपक दुपारगुडे | Updated: June 1, 2024 18:56 IST2024-06-01T18:55:40+5:302024-06-01T18:56:10+5:30

Solapur News: मालवंडी (ता. बार्शी) येथील नसिमा निजाम मुजावर या वृद्धेचा काठीने मारहाण करून खून केल्याप्रकरणात विश्वास खंडागळे व गणेश खंडागळे (रा. मालवंडी) या दोघांना पोलिसांनी अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता न्या. विजयकर यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Solapur: Two in police custody for three days in case of murder of elderly in Malvandi | Solapur: मालवंडीत वृद्धेच्या खून प्रकरणात दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी

Solapur: मालवंडीत वृद्धेच्या खून प्रकरणात दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी

- दीपक दुपारगुडे 
सोलापूर  - मालवंडी (ता. बार्शी) येथील नसिमा निजाम मुजावर या वृद्धेचा काठीने मारहाण करून खून केल्याप्रकरणात विश्वास खंडागळे व गणेश खंडागळे (रा. मालवंडी) या दोघांना पोलिसांनी अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता न्या. विजयकर यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

१५ मे २०२४ रोजी नसिमा मुजावर (वय ६०) या वृद्धेच्या हाता-पायावर काठीने मारहाण झाली होती. खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना २५ मे रोजी ती मरण पावली. पोलिस तपासात जखमा संशयित आढळल्या. मृताच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव आणि जखमांतून अति रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. तपासादरम्यान काठीने मारून दोघांकडून खून झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Solapur: Two in police custody for three days in case of murder of elderly in Malvandi