सोलापूर: 'बहिणीच्या नवऱ्याचे नणंदेसोबत संबंध'; वाच्यता केली म्हणून विवाहितेचं पतीनेच केलं मुंडन, भुवयांवरून फिरवला ट्रिमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:56 IST2025-04-03T12:55:29+5:302025-04-03T12:56:40+5:30
सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचं तिच्या पतीने मुंडन केलं आणि भुवयाही काढल्या. हे फक्त अनैतिक संबंधांची वाच्यता केली म्हणून करण्यात आलं.

सोलापूर: 'बहिणीच्या नवऱ्याचे नणंदेसोबत संबंध'; वाच्यता केली म्हणून विवाहितेचं पतीनेच केलं मुंडन, भुवयांवरून फिरवला ट्रिमर
Solapur Crime: आधी तिला पती, मेहुणा आणि नणंदेने मारहाण केली. छळाचा कळस म्हणजे पतीने तिचं मुंडन केलं आणि ट्रिमरने भुवया काढून संपूर्ण चेहरा विद्रुप केला. हादरवून टाकणारा हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये घडला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विवाहित महिलेचा तिघांनी छळ करण्याचे कारण म्हणजे तिने अनैतिक संबंधांची वाच्यता केली. पीडितेच्या तक्रारीवरून आता बार्शी शहर पोलिसांनी पीडितेचा पती, तिचा मेहुणा आणि नणंद अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बहिणीच्या पतीचे नणंदेसोबत अनैतिक संबंध
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या बहिणीच्या पतीचे म्हणजे मेहुण्याचे आणि तिची नणंद (पीडितेच्या पतीची बहीण) यांचे अनैतिक संबंध आहेत. हे पीडितेला कळल्यानंतर तिने याबद्दल तिच्या पतीला सांगितले.
वाचा >>'सॉरी हर्ष-माऊ' स्टेटस ठेवून आधी पित्यानं, दुसऱ्या दिवशी आईनेही जीवन संपवलं
त्यानंतर पतीने पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. फक्त पतीकडून नाही, तर ज्याचे अनैतिक संबंध आहेत, त्या मेहुणा आणि नणंदेही तिला मारहाण केली. शिवीगाळ केली.
पतीनेच पीडितेचं केलं मुंडन
पीडितेने सांगितले की, अनैतिक संबंधाबद्दल पतीला माहिती दिल्यानंतर त्याच्याकडून मारहाण सुरू झाली. एक दिवस पतीने ट्रिमरने तिचे डोक्यावरचे केस काढून टाकले. इतकंच नाही, तर त्याने पीडितेच्या भुवया काढल्या आणि चेहरा विद्रुप केला.
पतीकडून हे कृत्य झाल्यानंतर पीडितेला हा छळ असह्य झाला आणि तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना समोर आल्यानंतर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.