Solapur: पतीला मोबाईल देण्यास नकार दिला; दारूच्या नशेत पत्नीवर कात्रीने वार केला

By संताजी शिंदे | Updated: September 10, 2023 16:14 IST2023-09-10T16:13:38+5:302023-09-10T16:14:22+5:30

Solapur: मोबाईल न दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर कात्रीने वार केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur: Refusal to give mobile phone to husband; Drunk wife stabbed with scissors | Solapur: पतीला मोबाईल देण्यास नकार दिला; दारूच्या नशेत पत्नीवर कात्रीने वार केला

Solapur: पतीला मोबाईल देण्यास नकार दिला; दारूच्या नशेत पत्नीवर कात्रीने वार केला

- संताजी शिंदे 
सोलापूर - मोबाईल न दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर कात्रीने वार केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाणीश्री श्रीनिवास यासम (वय २५, रा. जुना विडी घरकुल, लक्ष्मी चौक, सोलापूर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पती श्रीनिवास मलय्या यासम (वय ३०) दारू पिऊन घरी आला होता. तेव्हां विडी कामगार असलेल्या वाणीश्री यासम या घरात विड्या वळण्याचे काम करीत होत्या. पतीने वाणीश्रीला त्याचा मोबाईल मागितला, तेव्हां त्यांनी तो देण्यास नकार दिला. श्रीनिवास हा जास्त दारू पिला होता, त्यामुळे पत्नीने मोबाईल दिला नाही. यातून दोघांमध्ये वाद झाला. पतीने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली, ऐवढ्यावरच न थांबता त्याने हातावर, दंडावर कात्रीने वार केला. वाणीश्री ही जखमी झाली, तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल पवार करीत आहेत.

Web Title: Solapur: Refusal to give mobile phone to husband; Drunk wife stabbed with scissors