Solapur: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर दिला नकार, तरुणाविरुद्ध गुन्हा

By विलास जळकोटकर | Published: May 13, 2024 06:04 PM2024-05-13T18:04:58+5:302024-05-13T18:06:33+5:30

Solapur News: जवळकीता साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीनं अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले यातून पिडित तरुणी गर्भवती राहिली. लग्नाची विचारणा करता नकार देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात उघडकीस आला.

Solapur: Rape by luring marriage; Denied after getting pregnant, crime against youth | Solapur: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर दिला नकार, तरुणाविरुद्ध गुन्हा

Solapur: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर दिला नकार, तरुणाविरुद्ध गुन्हा

- विलास जळकोटकर 
सोलापूर - जवळकीता साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीनं अत्याचार केला. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले यातून पिडित तरुणी गर्भवती राहिली. लग्नाची विचारणा करता नकार देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात उघडकीस आला. सन २०२० पासून आजतागायत हा प्रकार घडल्याची तक्रार पिडितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मनोद्दिन मुल्ला (नई जिंदगी, सोलापूर) याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी आणि नमूद आरोपीचे सन २०२० मध्ये ओळखीतून प्रेमसंबंध जुळले. आरोपीने पिडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. संबंधीत कृत्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचाराचे कृत्य केले.

या प्रकारामुळे सदर पिडिता चार महिन्याची गर्भवती राहिल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. यावर पिडितेने आरोपीला लग्नासंबंधी विचारणा केली. यावर त्याने ‘मी आता लगेच लग्न करु शकत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’ असे म्हणून निघून गेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यामुळे कोलमडलेल्या पिडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी पिडितेचे गाऱ्हाणं ऐकून तक्रार नोंदवून घेतली. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Solapur: Rape by luring marriage; Denied after getting pregnant, crime against youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.