Solapur: राधाकृष्ण विखे-पाटलांनी पोलीस ठाण्याचं उदघाटन केलं, ..अन नबाब मालिकांचं नाव काढलं!

By रवींद्र देशमुख | Updated: March 4, 2023 15:06 IST2023-03-04T15:05:00+5:302023-03-04T15:06:20+5:30

Solapur: भाजपचे जेष्ठ नेते अन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी  तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांचा नामोल्लेख केला. म्हणाले, मागील काळात काही राजकीय नेत्यांमुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे.

Solapur: Radhakrishna Vikhe-Patal inaugurated the police station. | Solapur: राधाकृष्ण विखे-पाटलांनी पोलीस ठाण्याचं उदघाटन केलं, ..अन नबाब मालिकांचं नाव काढलं!

Solapur: राधाकृष्ण विखे-पाटलांनी पोलीस ठाण्याचं उदघाटन केलं, ..अन नबाब मालिकांचं नाव काढलं!

- रवींद्र देशमुख

पंढरपूर/करकंब: भाजपचे जेष्ठ नेते अन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी  तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांचा नामोल्लेख केला. म्हणाले, मागील काळात काही राजकीय नेत्यांमुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे..पण मलिक आता जेलमध्ये आहेत.
करकंब पोलीस ठाण्याचे सकाळी विखे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

बॉम्ब स्फोटाशी निगडित असलेल्या आरोपींशी काही राजकीय लोकांचे संबंध निघाले. शिवाय मागील काळात मंत्री आणि काही पोलीस अधिकारीही तुरुंगात गेल्याचा उल्लेख विखे-पाटील यांनी केला. अवैधरित्या उत्खननावर ते म्हणाले की, खडी क्रशर, वाळू उपश्यावर कारवाई करण्यासाठी इतर जिल्हातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या अवैध उत्खननाला आळा बसेल.

सामान्य माणसाला लवकरच सहज व स्वस्त वाळू मिळेल. नागरिकांचे घर कमी किंमतीत बांधून होतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Solapur: Radhakrishna Vikhe-Patal inaugurated the police station.