Solapur: पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याच्या बांगड्या घेऊन गेले, सराफ बाजारात धक्कादायक प्रकार

By विलास जळकोटकर | Published: November 23, 2023 06:10 PM2023-11-23T18:10:18+5:302023-11-23T18:11:20+5:30

Solapur News: पोलिस असल्याची बतावणी करीत दोघेजण सराफ दुकानात शिरले. त्यांनी लहान मुलांची अंगठी घेण्याचे कारण सांगत ड्राव्हरमधील साधारण २ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या घेऊन पसार होण्याचा धक्कादायक प्रकार पूर्व मंगळवारपेठेतील सराफ बाजारामध्ये घडला.

Solapur: Pretending to be cops, gold bangles taken away, shocker in Saraf bazaar | Solapur: पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याच्या बांगड्या घेऊन गेले, सराफ बाजारात धक्कादायक प्रकार

Solapur: पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याच्या बांगड्या घेऊन गेले, सराफ बाजारात धक्कादायक प्रकार

- विलास जळकोटकर 
सोलापूर  - पोलिस असल्याची बतावणी करीत दोघेजण सराफ दुकानात शिरले. त्यांनी लहान मुलांची अंगठी घेण्याचे कारण सांगत ड्राव्हरमधील साधारण २ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या घेऊन पसार होण्याचा धक्कादायक प्रकार पूर्व मंगळवारपेठेतील सराफ बाजारामध्ये घडला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. विलास उद्धवराव वेदपाठक (वय- ३५, रा. काटगाव, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शहरामधील सराफ बाजारात शुक्रवारच्या साधारण ३:४० च्या सुमारास दोघे अनोळखी व्यक्ती विलास उद्धवराव वेदपाठक यांच्या पूर्व मंगळवार पेठेतील मनोज ज्वेर्ल्स या दुकानात आले. त्यांनी आपण पोलिस आहोत असे त्यांना सांगितले. लहान मुलासाठी अंगठी घ्यायची आहे म्हणून त्यांनी दाखवण्या सांगितले. या दरम्यान, त्यांनी ड्रॉव्हरमधील ४०.७५० ग्रॅम वजनाच्या ९१६ होलमार्कच्या ४ सोन्याच्या बांगड्या पाहिल्या. वेदपाठक यांच्या नकळत त्या घेतल्या आणि निघून गेले.

चार-पाच दिवसांनंतर सराफ व्यापारी वेदपाठक यांच्या लक्षात ही बाब आली. एवढ्या मोठ्या रक्कमेचा फटका बसल्याने त्यांना चैन पडेना. त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पुढील तपास सपोनि पवार करीत आहेत.

सराफ बाजारात खळबळ
याच महिन्यात व्हीआयपी रोडवरील कल्याण ज्वेलर्समधून बुरखाधारी महिलांनी दोन बांगड्या चोरुन नेल्या होत्या. त्यापैकी एकीला बुधवारी पकडले. पोलीस उर्वरित आरोपींच्या मागावर आहेत. हा गुन्हा उघडकीस येतो न येतो तोच, पुन्हा दुसऱ्यांना अशाचप्रकारे सोन्याच्या चार बांगड्या चोरीस गेल्याने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.

Web Title: Solapur: Pretending to be cops, gold bangles taken away, shocker in Saraf bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.