Solapur: एमआयएमचा एक नगरसेवक आणि पाच नगरसेविकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 20:02 IST2022-08-12T20:02:30+5:302022-08-12T20:02:48+5:30

Solapur News: एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह पाच नगरसेविकांनी शुक्रवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Solapur: One MIM corporator and five corporators join NCP | Solapur: एमआयएमचा एक नगरसेवक आणि पाच नगरसेविकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Solapur: एमआयएमचा एक नगरसेवक आणि पाच नगरसेविकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर  - एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह पाच नगरसेविकांनी शुक्रवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मागील महापालिका निवडणुकीत एमआयएमचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले होते. यापैकी तौफिक शेख, वाहिदाबी शेख, पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, तस्लीम शेख, शाजिया शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी गटनेते रियाज करावी लवकरच प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला  जिल्हा निरीक्षक शेखर माने,  शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Solapur: One MIM corporator and five corporators join NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.