Solapur: स्वयंपाकाला भांडी दिली नाही, जेवणही दिले नाही, दांडक्याने मारुन सहकाऱ्याचा खून, मजुराला अटक

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 29, 2023 22:28 IST2023-05-29T22:27:01+5:302023-05-29T22:28:16+5:30

Solapur: जेवण बनवायला भांडी का देत नाही, बनविलेले जीवन ही देत नाही या कारणावरून जोडीदार कामगाराचा डोक्यात लाकूड घालून खून केल्याची घटना मोहोळ तालुक्यात पाटकूल येथे सोमवार, पहाटे २९ मे रोजी घडली.

Solapur: No cooking utensils, no food, colleague killed by caning, laborer arrested | Solapur: स्वयंपाकाला भांडी दिली नाही, जेवणही दिले नाही, दांडक्याने मारुन सहकाऱ्याचा खून, मजुराला अटक

Solapur: स्वयंपाकाला भांडी दिली नाही, जेवणही दिले नाही, दांडक्याने मारुन सहकाऱ्याचा खून, मजुराला अटक

- काशिनाथ वाघमारे 
सोलापूर  : जेवण बनवायला भांडी का देत नाही, बनविलेले जीवन ही देत नाही या कारणावरून जोडीदार कामगाराचा डोक्यात लाकूड घालून खून केल्याची घटना मोहोळ तालुक्यात पाटकूल येथे सोमवार, पहाटे २९ मे रोजी घडली.

कृष्णा निसाद असे खून झालेल्या बांधकाम मजुराचे नाव असून त्याचा साथिदार मारेकरी पुखराम सीताराम निसाद याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पाटकुल येथील विश्वजीत वीरसेन देशमुख यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या कामावर छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील कृष्णा निसाद व पुखराम सीताराम निसाद हे दोन मजू काम करत होते. कृष्णा व पुखराम या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन शाब्दिक वाद व्हायचा.

२८ मे रोजी रात्री पुखराम याने कृष्णा यास जेवण बनवण्यासाठी भांडी मागितली होती. ती कृष्णा याने न दिल्याच्या कारणावरून तो चिडून होता. रागाच्या भरात पुखराम याने २९ मे रोजी पहाटे कृष्णा याच्या डोक्यात लाकूड घातला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटने नंतर पुखराम याने बांधकाम मालक देशमुख यांना फोन करून कृष्णा हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.

घटनेनंतर लोक जमा झाले. काही लोकांनी पुखरामला पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याची चौकशी केली. कृष्णा जेवण देत नव्हता व जेवणाची भांडीही देत नव्हता. त्यामुळे कृष्णा याच्या डोक्यात रागाच्या भरात लाकडी दांडका मारल्याची कबुली पेालिंसापुढे दिली. त्यानुसार मोहोळ पोलिसांनी पुखराम याला अटक केली.

Web Title: Solapur: No cooking utensils, no food, colleague killed by caning, laborer arrested