सोलापूर महापालिकेने तयार केला २५ टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव, नव्या योजनेचा भार, प्रशासनाचा प्रस्तावाला होणार विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:19 IST2018-02-15T12:18:35+5:302018-02-15T12:19:30+5:30
आगामी आर्थिक वर्षात शहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला आहे.

सोलापूर महापालिकेने तयार केला २५ टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव, नव्या योजनेचा भार, प्रशासनाचा प्रस्तावाला होणार विरोध
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : आगामी आर्थिक वर्षात शहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला आहे.
प्रशासनाने सन २0१२—१३ च्या प्रचलित पाणीपट्टीत सन २0१८—१९ पासून २५ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करता पाणी पुरवठ्यावर मोठी तूट सहन करावी लागत आहे. शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी दर दिवशी प्रति माणसी ९0 ते १00 लिटर पाणी पुरवठा होतो असा दावा करण्यात आला आहे. अमृत योजनेतून पाणी पुरवठा योजना सुधारणेची कामे सुरू आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येणार आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या जुन्या झाल्याने ते बदलणे व दुरूस्तीच्या खर्चात वाढ होत आहे. जलसंपदा विभागाकडून उजनीतून देण्यात येणाºया पाणीपट्टीत भरमसाठ वाढ केली आहे. नवीन दुहेरी जलवाहिनीचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाने जादा निधी दिल्यास या कामाचे टेंडर काढण्यात येणार आहे. याबाबींचा विचार करता ना नफा ना तोटा या तत्वावर पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करणे क्रमप्राप्त असल्याचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास घरगुती पाणीपट्टीत सुमारे ७५0 ़रुपयाची वाढ होणार आहे.
अमृत योजनेतून २ कोटी ५९ लाख खर्चून विविध बागा हिरव्यागार करण्याच्या टेंडरचा मंजुरीचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये गंगानगर मोकळी जागा, कस्तुरबा बाग, विद्यानगर मोकळी जागा, शाह उद्यान, वसंतविहार:२ मधील मोकळी जागा, नवे विडी घरकुल, सदिच्छानगर (सिव्हिल वर्क टेंडर: ३९ लाख ९७ हजार), विद्यानगर, शाह उद्यान (हॉर्टीकल्चर: ६४ लाख १८ हजार), वसंतविहार, विडी घरकुल, सदिच्छानगर (हॉर्टीकल्चर: ३६ लाख ८ हजार), जानकीनगर (हॉर्टीकल्चर: २९ लाख ७१ हजार), गंगानगर, कस्तुरबा बाग (हॉर्टीकल्चर: ५९ लाख ७८ हजार), आसरा पूल ते मजरेवाडी रेल्वेगेटपर्यंत वृक्षारोपण करणे (२९ लाख ६७ हजार) या कामांना वर्कआॅर्डर देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच हायलेव्हल झोन व मेडिकल पंपहाऊस येथे नवीन ९0 एचपीचे पंप बसविण्याची वर्कआॅर्डर (खर्च: ८१ लाख ५६ हजार) देण्याचा प्रस्ताव आहे.
-------------------
जाहीरनामा तपासून पहा : आनंद चंदनशिवे
प्रशासनाने पाठविलेली २५ टक्के पाणीपट्टी वाढ आम्ही हाणून पाडू. दररोजच्या पाणी पुरवठ्याची सध्याची पाणीपट्टी आकारली जाते, पण पाणी तीन,चार ते सहा दिवसाआड दिले जाते.अगोदर पाणीपुरवठा सुरळीत करा मग पाणीपट्टी वाढीच ेपाहू.निवडणूक होऊन २३ फेब्रुवारी रोजी एक वर्ष होत आहे.अशात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपने पाणीपट्टी वाढीचे पाप करू नये.त्यांनी निवडणूक जाहीरनामा तपासून पाहावा. असे बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे म्हणाले.