सोलापूर महापालिका आयुक्तांचा व्हाट्सअप अन् फेसबुक हॅक; बनावट खात्यावरून पैशाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:50 IST2026-02-14T01:49:58+5:302026-02-14T01:50:46+5:30

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे याचं अज्ञात अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप व फेसबुक या सोशल मीडिया अँपवर ...

Solapur Municipal Commissioner's WhatsApp and Facebook hacked; Money demanded from fake account | सोलापूर महापालिका आयुक्तांचा व्हाट्सअप अन् फेसबुक हॅक; बनावट खात्यावरून पैशाची मागणी

सोलापूर महापालिका आयुक्तांचा व्हाट्सअप अन् फेसबुक हॅक; बनावट खात्यावरून पैशाची मागणी

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे याचं अज्ञात अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप व फेसबुक या सोशल मीडिया अँपवर आयुक्त याचं फोटो व नाव नमूद करून बनावट (फेक) फेसबुक अकाउंट तयार केले आहे.

सदर फेक अकाउंटद्वारे चॅट तसेच फोनच्या माध्यमातून माझे मित्र, नातेवाईक व इतर नागरिक यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे अशी माहिती आयुक्त ओम्बासे यांनी लोकमत शी बोलताना दिली. 

दरम्यान, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून संबंधित व्यक्ती नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या नावाचा व छायाचित्राचा गैरवापर करून करण्यात येणारी ही कृत्ये माझ्या वैयक्तिक व प्रशासकीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी आहेत. सदर प्रकार हा सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत असून याबाबत संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे.

Web Title : सोलापुर आयुक्त का व्हाट्सएप, फेसबुक हैक; फर्जी खातों से पैसे की मांग

Web Summary : सोलापुर महानगरपालिका आयुक्त का व्हाट्सएप और फेसबुक हैक हो गया। धोखेबाज संपर्क से पैसे मांग रहे हैं, जिससे साइबर अपराध की शिकायत दर्ज कराई गई है। नागरिकों को सावधान रहना चाहिए।

Web Title : Solapur Commissioner's WhatsApp, Facebook Hacked; Money Demanded Via Fake Accounts

Web Summary : Solapur Municipal Commissioner's WhatsApp and Facebook were hacked. Impersonators are requesting money from contacts, prompting a cybercrime complaint. Citizens should be aware.