सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा; व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:06 IST2025-08-12T17:06:15+5:302025-08-12T17:06:35+5:30

Solapur-Mumbai Airplane Service: बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. 

Solapur-Mumbai air service cleared; State Cabinet approves viability gap funding | सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा; व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा; व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

सोलापूर - बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर -पुणे - मुंबई विमानसेवेकरीता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली. 

सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरिता सोलापूर शहरातून मुंबई, बेंगलोर, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती. परंतु सोलापुर - मुंबई - सोलापूर विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती. उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे यात अनेक अडथळे येत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ. देवेंद्र कोठे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली होती. यानंतर सोलापूर - मुंबई - सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू, असे आश्वासन फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिले होते. लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत व्हायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर - मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.

Web Title: Solapur-Mumbai air service cleared; State Cabinet approves viability gap funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.