Solapur: नशेत ‘त्या’ वृद्धानं गळफास घेऊन केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

By विलास जळकोटकर | Updated: June 27, 2024 19:51 IST2024-06-27T19:50:52+5:302024-06-27T19:51:27+5:30

Solapur News: दारुच्या नशेमध्ये एका ७० वर्षीय वृद्धानं राहत्या घरी दारुच्या नशेमध्ये कात्याच्या दोरीने लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कुमार नगरात ही घटना उघडकीस आली. चंद्रकांत मल्लिकार्जुन कांबळे (वय- ७०, रा. कुमार नगर, मजरेवाडी, सोलापूर) असे या वृद्धाचे नाव आहे.

Solapur: Drunk 'that' old man tried to end his life by hanging himself | Solapur: नशेत ‘त्या’ वृद्धानं गळफास घेऊन केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

Solapur: नशेत ‘त्या’ वृद्धानं गळफास घेऊन केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

- विलास जळकोटकर  
सोलापूर - दारुच्या नशेमध्ये एका ७० वर्षीय वृद्धानं राहत्या घरी दारुच्या नशेमध्ये कात्याच्या दोरीने लाकडी वाशाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कुमार नगरात ही घटना उघडकीस आली. चंद्रकांत मल्लिकार्जुन कांबळे (वय- ७०, रा. कुमार नगर, मजरेवाडी, सोलापूर) असे या वृद्धाचे नाव आहे.
यातील वृद्ध मजरेवाडी सोलापूर येथील कुमार नगरात वास्तव्यास आहे. गुरुवारी सकाळी त्यांचे दारु प्राशन केली होती. या नशेत त्याने कात्याच्या दोरीने घरातील लाकडी वाशाला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी बेशुद्धावस्थेत खाली उतरवले.

मुलगी अनिता यांनी तातडीने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील जखमी बेशुद्धावस्थेत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सदरचा प्रकार कशामुळे करण्यात आला याचे कारण गुलदस्त्यात असून, सिव्हील पोलीस चौकीतील एमएलसी रजिस्टरमध्ये दारुच्या नशेत अज्ञात कारणावरुन अशी नोंद करण्यात आलेली आहे.

Web Title: Solapur: Drunk 'that' old man tried to end his life by hanging himself