शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले ३२१ कोटी, ‘यलो’ यादीतील पात्र २३३४ शेतकºयांची यादी यापूर्वीच शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:53 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीच्या आॅनलाईन अर्ज केलेल्या उर्वरित खातेदारांची पात्र व अपात्र यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

ठळक मुद्दे पाचव्या यादीतील दोन हजार ५२७ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी ५२ लाख ५३ हजार ४५० रुपये जमा करण्याचे काम सध्या सुरू बँकेला आतापर्यंत शेतकºयांच्या सहा याद्या आल्या असून यापैकी ५४ हजार ६६३ शेतकºयांच्या खात्यावर २७५ कोटी ७३ लाख ५४ हजार ८५५ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली‘मिसमॅच’मधील ३३ हजार २२६ पात्र शेतकºयांचीही यादी शासनाला पाठविण्यात आली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्हा बँकेला नव्याने १९ हजार ७१४ शेतकºयांची ग्रीन यादी आली असून, सोबत दोन टप्प्यात ४६ कोटी १७ लाख २१ हजार ७०९ रुपयेही आले आहेत. जिल्हा बँकेला आतापर्यंत ३२१ कोटी ८३ लाख २६ हजार २०४ रुपये कर्जमाफीसाठी मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीच्या आॅनलाईन अर्ज केलेल्या उर्वरित खातेदारांची पात्र व अपात्र यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘यलो’ यादीतील पात्र २३३४ शेतकºयांची यादी यापूर्वीच शासनाकडे गेली असून ‘मिसमॅच’मधील ३३ हजार २२६ पात्र शेतकºयांचीही यादी शासनाला पाठविण्यात आली आहे. या यादीची शासन स्तरावर तपासणी करून पैसे देण्यात येत आहेत. शासनाकडून आलेल्या व बँकेकडून तपासणी करून शासनाकडे पुन्हा गेलेल्या यादीमधील १९ हजार ७१४ शेतकºयांची नव्याने यादी जिल्हा बँकेकडे आली आहे. ही यादी बँक तपासणी करणार आहे. बँकेला आतापर्यंत शेतकºयांच्या सहा याद्या आल्या असून यापैकी ५४ हजार ६६३ शेतकºयांच्या खात्यावर २७५ कोटी ७३ लाख ५४ हजार ८५५ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.  यापूर्वी आलेल्या पाचव्या यादीतील दोन हजार ५२७ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी ५२ लाख ५३ हजार ४५० रुपये जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे. नव्याने बुधवारी आलेले ३१ कोटी ६४ लाख ६८ हजार २५९ रुपये शासन सूचनेनुसार जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले. ------------------------८८ हजार शेतकरी पात्र - जिल्हा बँकेला आतापर्यंत वेगवेगळ्या याद्या आल्या आहेत. यामध्ये ‘ग्रीन’ याद्या चार वेळा तर ‘यलो’ व मिसमॅच याद्या प्रत्येकी एक वेळा आली आहे. या याद्यांची तपासणी करून एक लाख १८ हजार ५६१ खातेदारांची ग्रीन यादी बँकेला आली होती. यापैकी ८७ हजार ७८० खातेदारांची यादी अचूक आहे. बँकेच्या एक लाख ६८ हजार ५६५ शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले होते. -जिल्ह्यातील दीड लाखापर्यंतच्या थकबाकीदार ३९ हजार २३५ शेतकºयांच्या खात्यावर २४७ कोटी २६ लाख ३४ हजार ५०२ रुपये जमा झाले असून, नियमित कर्ज भरणाºया १५ हजार ४२८ शेतकºयांच्या खात्यावर २८ कोटी २९ लाख १४ हजार १४२ रुपये जमा झाले आहेत. दीड लाखावरील थकबाकीदार पात्र शेतकºयांची संख्या १६ हजार २२० इतकी असून, यापैकी ९०० शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली असल्याने त्यांच्या खात्यावर दीड लाखाप्रमाणे रक्कम जमा करण्यासाठी चार कोटींचा निधी आला आहे. ---------------------शासनाने उर्वरित खातेदारांची यादी व पैसे लवकर द्यावेत. दीड लाखावरील खातेदारांंनी रक्कम भरल्यानंतर किमान आठ दिवसात त्यांच्या खात्यावर दीड लाखाची रक्कम जमा करण्यासाठी आमच्या बँकेला आगाऊ रक्कम द्यावी. आमच्याकडे आलेल्या पात्र खातेदारांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा करीत आहोत.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी