शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे.त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर दि १७ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेला एकूण ९५ हजार १७९ शेतकºयांची यादी आली असून त्यांच्यासाठी ३५९ कोटी ३४ हजार १२७ रुपयांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात बँकेला २७५ कोटी ६६ लाख चार हजार ५०१ रुपये देण्यात आले होते. आलेल्या यादीची तपासणी केली असता ६६ हजार ८०९ शेतकºयांची कर्जखात्याची माहिती बरोबर आढळली. तपासणीत २८ हजार ३७० शेतकºयांच्या खात्याबाबत चुका निघाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करून बरोबर असलेली शेतकºयांची याद शासनाकडे पाठवली आहे. या यादीबाबत शासनाने अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. बँकेने आतापर्यंत ५१ हजार १८१ शेतकºयांच्या खात्यावर २६५ कोटी ७ लाख ८१ हजार २९० रुपये जमा केले आहेत. दीड लाखावरील कर्जदारांची संख्या २५ हजार ४६१ इतकी असून या शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली तरच त्यांना दीड लाखाची रक्कम मिळणार आहे.नव्याने १० हजार १४० शेतकºयांची त्रुटी असलेली यादी तर ४७ हजार ११ शेतकºयांच्या यादीत मेळ (मिसमॅच) नसलेली यादी जिल्हा बँकेला मिळाली आहे. ही यादी अंतिम असून तिला शासनाने ‘यलो’(पिवळी) संभोधले आहे. यादीतील शेतकºयांच्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून परत शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. ----------------------------आठ कोटी दिले परत- जिल्हा बँक व आॅनलाईन भरलेल्या फॉर्ममधील माहितीत मेळ नसलेल्या (मिसमॅच)च्या ४७ हजार ११ शेतकºयांच्या याद्या बँकेच्या शाखेत लावण्यात येतील.- त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे.- तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार आहे.- कर्जमाफीसाठी दिलेल्यांपैकी ८ कोटी रुपये शासनाला परत दिले असून बँकेकडे दोन कोटी ५८ लाख २३ हजार २११ रुपये शिल्लक आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी