सोलापूर : देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचे टायर फुटून तिघे जागीच ठार

By विलास जळकोटकर | Updated: March 21, 2023 14:26 IST2023-03-21T14:26:31+5:302023-03-21T14:26:51+5:30

वाहन झाले पलटी, पाच जखमी तामलवाडीजवळ अपघात

Solapur: Devotees on their way to darshan of Goddess Kalapur were attacked, three died on the spot due to tire burst. | सोलापूर : देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचे टायर फुटून तिघे जागीच ठार

सोलापूर : देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचे टायर फुटून तिघे जागीच ठार

विलास जळकोटकर

सोलापूर : सोलापूर पासून 15 किलोमीटर अंतरावरील कटारे मिनिंग मिल जवळ बोलेरो वाहनाचे टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन तिघे जागीच ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. वाहनातील सर्वजण तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.

जागीच ठार झालेल्यांमध्ये निखिल रामदास सानप (वय २१, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक ) ,अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२, रा चास ता. सिन्नर, जि. नाशिक), अथर्व शशिकांत खैरनार(वय २२, चास, ता सिन्नर जि. नाशिक ) यांचा समावेश आहे तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२),  पंकज रवींद्र खैरनार (वय ३०),  जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास,  ता. सिन्नुर जि.  नाशिक  अशी पाच जखमींची नावे आहेत.

यातील जखमी व महेश झालेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला MH15 EX 3211 या बोलेरो वाहनातून देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सातच्या सुमारास त्यांची गाडी सोलापूर तुळजापूरच्या सीमेवर असलेल्या कटारे स्विमिंग जवळ आली असता वाहनाचे टायर फुटल्याने ती पलटी होऊन तिघे मृत्यू पावले तर तिघे जखमी झाले. जखमींना तातडीने तामलवाडी टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केली असता वरील तिघे उपचारापूर्वीच मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर तिघांवर उपचार सुरू आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार
या अपघातातील जखमींपैकी तिघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोघांवर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Solapur: Devotees on their way to darshan of Goddess Kalapur were attacked, three died on the spot due to tire burst.