Solapur: सुनेचा विनयभंग, सासरा व दिरावर गुन्हा

By दिपक दुपारगुडे | Updated: June 21, 2023 17:40 IST2023-06-21T17:40:08+5:302023-06-21T17:40:24+5:30

Solapur: सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासरा व दिरावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचा छळ केल्याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

Solapur: Daughter-in-law molested, crime against father-in-law and daughter-in-law | Solapur: सुनेचा विनयभंग, सासरा व दिरावर गुन्हा

Solapur: सुनेचा विनयभंग, सासरा व दिरावर गुन्हा

- दीपक दुपारगुडे 
सोलापूर : सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासरा व दिरावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचा छळ केल्याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

विवाहानंतर पीडितेला आरोपींनी व्यवस्थित नांदवले नाही. शिवाय, मानसिक त्रास देत होते. पीडितेचे पती हे कामाला गेल्यानंतर त्यांच्या सासऱ्याने व दिराने केस पकडून मारहाण करत त्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केले. याबाबत पीडितेने पतीला सांगितल्यानंतर त्यानेही उलट त्यांनाच मारहाण केली. सासूनेही मानसिक त्रास दिला, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून पती, सासरा, सासू, दीर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Solapur: Daughter-in-law molested, crime against father-in-law and daughter-in-law