मारहाण अन् क्रूर वागणूक दिल्यानं सोलापुरात मुलीची आईविरुद्ध तक्रार

By विलास जळकोटकर | Published: June 22, 2024 09:14 PM2024-06-22T21:14:25+5:302024-06-22T21:14:34+5:30

मुलांची काळजी व संरक्षण कलमान्वये गुन्हा दाखल

Solapur Crime Complaint of girl against mother for beating and cruel treatment | मारहाण अन् क्रूर वागणूक दिल्यानं सोलापुरात मुलीची आईविरुद्ध तक्रार

मारहाण अन् क्रूर वागणूक दिल्यानं सोलापुरात मुलीची आईविरुद्ध तक्रार

सोलापूर : किरकोळ कारणावरुनही आईकडून शिवीगाळ व मारहाण करुन क्रूर वागणूक दिली जात असल्याची तक्रार १७ वर्षीय मुलीनं आपल्या आईविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी ही १७ वर्षीय असून, तिच्या आईकडून सतत किरकोळ कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करुन क्रूर वागणूक दिली जात आहे. मंगळवारी घरी आलेल्या ‘त्या’ व्यक्तीवरुन भांडण होऊन शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्याला बोलावू नको असं म्हणाल्याने हा प्रकार घडला. एरवीही किरकोळ कारणावरुन मारहाण केली जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदर बझार पोलीस ठाण्यात या प्रकरणी भा. दं. वि. ३२३ सह मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार बनसोडे करीत आहेत.
 

Web Title: Solapur Crime Complaint of girl against mother for beating and cruel treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.