Solapur: अल्पवयीन मुलीचा बालविवाह, पी़डितेच्या आई-वडिलांसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: March 10, 2024 18:42 IST2024-03-10T18:41:49+5:302024-03-10T18:42:13+5:30
Solapur Crime News: अल्पवयीन मुलगी असतानाही तिचे लग्न लावून दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ॲक्शन घेऊन पिडितेचे आई-वडील, तिची सासू, पती या चौघांविरुद्ध बालविवाह कायदा कलमासह अत्याचार आणि बाललैंगिक छळाच्या अधिनियमानुसार शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पतीला अटक केली आहे.

Solapur: अल्पवयीन मुलीचा बालविवाह, पी़डितेच्या आई-वडिलांसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा
- विलास जळकोटकर
सोलापूर - अल्पवयीन मुलगी असतानाही तिचे लग्न लावून दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ॲक्शन घेऊन पिडितेचे आई-वडील, तिची सासू, पती या चौघांविरुद्ध बालविवाह कायदा कलमासह अत्याचार आणि बाललैंगिक छळाच्या अधिनियमानुसार शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पतीला अटक केली आहे.
शहरातील एका भागातील मंदिराजवळ ही घटना १० फेब्रुवारी २०२३ रोजी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याच्या सपोनि संजीवनी व्हट्टे यांनी फिर्याद दिली आहे. यातील घटना अशी की, शहरातील एका समाजामध्ये १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा तिच्या आई-वडिलांनी त्यांच्या नाततल्या मुलाशी गतवर्षी १० फेब्रुवारी रोजी एका मंदिरात लग्न लावून दिले. लग्नानंतर तिला निसर्गनियमाप्रमाणे दिवस गेल्याचे दवाखान्यातील तपासणीत आढळून आले.
सदर बझार पोलिसांना याची खबर मिळताच त्यांनी शहानिशा केली असता सदरचा प्रकार उघडकीला आला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर या प्रकरणाला पिडितेची आई-वडील, तिची सासू, पिडितेचा पती जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन चौघांविरुद्ध भा. दं. वि. ३७६, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम तसेच बालविवाह कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. पिडितेच्या पतीला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपासणी सपोनि अहिवळे करीत आहेत.