सोलापूरचा व्यापारी, ७२ लाख आणि नेपाळमधील रॅकेट; पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:40 IST2026-03-13T15:37:10+5:302026-03-13T15:40:21+5:30

Solapur cyber Fraud News: नेपाळमधून सहकाऱ्यांसोबत रॅकेट चालवत असलेल्या एकाने सोलापुरातील एका व्यापाऱ्याची ७२ लाखांना फसवणूक केली. 

Solapur businessman, 72 lakhs and racket in Nepal; Police arrest in Delhi | सोलापूरचा व्यापारी, ७२ लाख आणि नेपाळमधील रॅकेट; पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या

सोलापूरचा व्यापारी, ७२ लाख आणि नेपाळमधील रॅकेट; पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या

Solapur Crime: सोलापूरमधील व्यापाऱ्याला १० ते ३०० टक्क्यांपर्यंत फायदा मिळवून देतो असे सांगून ७२ लाख ६४ हजारांना फसवल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी रोज मगर थापा (वय २३, रा. बोसन, काठमांडू, नेपाळ) याला अटक केली. आरोपीला सोलापूर सायबर पोलिसांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावरून ८ मार्चला अटक केली. 

आरोपीने व्यापारी आहुजा यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधून जास्त फायदा करून देण्याचे आमिष देऊन फिर्यादीस ७२ लाख रुपयांना फसवले होते. या गुन्ह्यात सोलापूर शहर सायबर पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४ आरोपी निष्पन्न केले होते. 

याच प्रकरणाचा सूत्रधार आरोपी रोज थापा व त्याचे सहकारी आरोपी दोरजे तमांग यांनी आहुजा यांच्या फसवणूक रकमेपैकी काही रक्कम खासगी बँकेत वर्ग केले होते. यातील जवळपास १७ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले.

कमिशन देऊन बँक खाते घ्यायचा भाड्याने

सूत्रधार आरोपी रोज मगर थापा हा नेपाळचा नागरिक आहे. नेपाळ येथे संपर्कात आलेल्या चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात आपल्या अन्य साथीदारांसोबत येऊन भारतीय नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते गुन्ह्यात वापरण्यास घेतो. 

त्या खात्यातून फसवणुकीची रक्कम स्वीकारून, रक्कम पुढे वर्ग करत होता. आरोपीने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिमबंगाल, मध्य प्रदेश व मणिपूर येथे राहून फसवणुकीचे काम करत होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवून त्याचे विरुद्ध सन २०२५ मध्ये लूक आऊट नोटीस काढण्यात आली होती.

Web Title : सोलापुर व्यापारी ठगा: नेपाल रैकेट का भंडाफोड़, दिल्ली में गिरफ्तारी

Web Summary : सोलापुर के एक व्यापारी को नेपाल स्थित रैकेट ने उच्च लाभ का वादा करके 72 लाख रुपये का चूना लगाया। पुलिस ने सरगना रोज मगर थापा को दिल्ली में गिरफ्तार किया। थापा ने धोखाधड़ी वाले लेनदेन के लिए किराए के भारतीय बैंक खातों का इस्तेमाल किया।

Web Title : Solapur Trader Duped: Nepal Racket Busted, Key Arrest in Delhi

Web Summary : A Solapur trader was defrauded of ₹72 lakh by a Nepal-based racket promising high returns. Police arrested the mastermind, Rose Magar Thapa, in Delhi. Thapa used rented Indian bank accounts for fraudulent transactions, moving money through multiple states before his capture at Delhi airport.