सोलापूर : पुढील निवडणुकीत भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य मठातच बसतील  

By राकेश कदम | Updated: April 27, 2023 19:03 IST2023-04-27T19:00:53+5:302023-04-27T19:03:27+5:30

वाद पेटणार : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषाेत्तम बरडे यांची टीका

Solapur BJP MP Jaisiddheshwar Shivacharya will sit in the Math in the next elections | सोलापूर : पुढील निवडणुकीत भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य मठातच बसतील  

सोलापूर : पुढील निवडणुकीत भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य मठातच बसतील  

भाजपचे खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी खर तरे मठात हवे हाेते. पुढील निवडणुकीत त्यांना मठातच ठेवले जाईल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषाेत्तम बरडे यांनी बुधवारी केली. 

येथील काॅंग्रेस भवनात बरडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, देशातील वातावरण बिघडविण्याचे काम भाजपचे लाेक करीत आहेत. महागाई, बेराेजगारी हे मुद्दे साेडून हिंदू मुस्लिम, मिरवणुका यावर भर दिला जात आहे. यातून वातावरण कसे बिघडेल याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यातील कसब्याच्या निवडणुकीनंतर वातावरण बदलले आहे. पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येउन काम केले. त्याच पध्दतीने आगामी काळात केले तर भाजपचा पराभव हाेईल.

Web Title: Solapur BJP MP Jaisiddheshwar Shivacharya will sit in the Math in the next elections