Solapur: सोलापुरात भाजपाला मोठा धक्का, BRSमध्ये प्रवेश करण्यासाठी चार माजी नगरसेवक हैदराबादकडे रवाना

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 8, 2023 12:59 IST2023-07-08T12:59:28+5:302023-07-08T12:59:57+5:30

Solapur: भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले चार माजी नगरसेवक बीआरएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी शनिवारी सकाळी हैदराबादकडे रवाना झाले आहेत.

Solapur: Big blow to BJP in Solapur, four former corporators leave for Hyderabad to join BRS | Solapur: सोलापुरात भाजपाला मोठा धक्का, BRSमध्ये प्रवेश करण्यासाठी चार माजी नगरसेवक हैदराबादकडे रवाना

Solapur: सोलापुरात भाजपाला मोठा धक्का, BRSमध्ये प्रवेश करण्यासाठी चार माजी नगरसेवक हैदराबादकडे रवाना

- बाळकृष्ण दोड्डी 
सोलापूर -  भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले चार माजी नगरसेवक बीआरएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी शनिवारी सकाळी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. यात माजी नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण, जुगनबाई आंबेवाले यांचा समावेश आहे. पक्षप्रवेशाकडे सुरेश पाटील यांनी पाठ फिरवली आहे. २० जुलै नंतर माजी नगरसेवक सुरेश पाटील हे बीआरएस मध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

साठ गाड्या अन् ३०० समर्थकांचा ताफा घेऊन चार माजी नगरसेवक केसीआर यांच्या भेटीला निघाले आहेत. हैदराबाद येथील प्रगती भवन मध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत नागेश वल्याळ, जुगनबाई आंबेवाले, राजश्री चव्हाण, संतोष भोसले यांच्यासह पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे सुद्धा बीआरएसमध्ये प्रवेश घेणार आहेत. सायंकाळी सहा दरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

Web Title: Solapur: Big blow to BJP in Solapur, four former corporators leave for Hyderabad to join BRS