Solapur: पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा अपघात; एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

By Appasaheb.patil | Updated: December 5, 2023 13:10 IST2023-12-05T13:10:06+5:302023-12-05T13:10:47+5:30

Pandharpur Accident News: तुळजापूर, अक्कलकोट येथील देव दर्शनानंतर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या परभणी येथील भाविकांच्या गाडीचा अपघात तुंगत (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी सकाळी झाला. यामध्ये एक जणाचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत.

Solapur: Accident of devotees coming for darshan of Vitthala of Pandharpur; One killed and 20 injured | Solapur: पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा अपघात; एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

Solapur: पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा अपघात; एकाचा मृत्यू तर २० जण जखमी

- आप्पासाहेब पाटील
पंढरपूर - तुळजापूर, अक्कलकोट येथील देव दर्शनानंतर पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या परभणी येथील भाविकांच्या गाडीचा अपघात तुंगत (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी सकाळी झाला. यामध्ये एक जणाचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्याा माहितीनुसार, सोलापूर येथून एमएच ०८ ए. पी. ०७१३ मध्ये २३ भाविक तुळजापूर, अक्कलकोट येथील देवाचे दर्शन घेऊन पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यांचे वाहन तुंगत येथील वळणावर आले असता वाहन चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. यामुळे वाहनातील चिमाजी दिगंबर शेम्बुले (वय ४०, रा. सायाळा, ता. पालम, जि. परभणी) याचा मुत्यू झाला आहे.

त्याचबरोबर मुजाजी प्रभाकर नवघरे, कैलास तुकाराम आव्हाड, महारुद्र लक्ष्मण आव्हाड, भरत महादेव आव्हाड, गुणाजी मारुतीराव नवघरे, लक्ष्मण रामचंद्र चवरे, अंगद प्रल्हाद नवघरे, एकनाथ देवराव भुमरे, विलास लक्ष्मण नारले, विलास माणिक नवघरे, लक्ष्मण हरीभाऊ नवघरे, विलास साहेबराव डोंगरे, बळीराम बालाजी नवघरे, करण मोतीराम नवघरे मंचक ज्ञानुजी चावरे, खंडू दिगंबर मोटे, भागवत रुस्तूम नवघरे, अंगद पुंडलिक चवरे, नितीन विकास डोंगरे, गजानन केशव चवरे (सर्व रा. सायला, ता. पालम, जि. परभणी) हे भाविक जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रल्हाद विठ्ठल नवघरे (रा. सायाळा, ता. पालम, जि. परभणी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Solapur: Accident of devotees coming for darshan of Vitthala of Pandharpur; One killed and 20 injured