शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

सोलापूरात ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धा, मुलांमध्ये पंजाब तर मुलींमध्ये चंदीगड राज्याला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदके : मुलांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:59 PM

 क्रीडा व युवक संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर,सोलापूर शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त  विद्यमाने आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यांने केगाव येथील सिंहगड इंस्टीट्युटच्या कॅम्पसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून १९ वषार्खालील राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुरू होत्या.

ठळक मुद्देकेगाव येथील सिंहगड इंस्टीट्युटच्या कॅम्पसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून १९ वषार्खालील राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुरू होत्यामुलांमध्ये १९ गुणांसह महाराष्ट्राला उपविजेतेपद१ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर महाराष्ट्राला समाधान मानावे लागलेवैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा खेळाडू गिरीश जकाते  ( सांगली ) याला सुवर्णपदक मिळाले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ :  राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत मुलांमध्ये २५ गुणांसह "पंजाब" तर मुलींमध्ये २१गुणांसह "चंदीगड " राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये चंदीगड आणि पंजाब राज्याला प्रत्येकी २१ गुण मिळाले मात्र चंदीगडला २  सुवर्णपदके मिळाल्याने चंदीगडला सर्वसाधारण विजेतेपद बहाल करण्यात आले. मुलांमध्ये १९ गुणांसह महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळाले. १ सुवर्ण,१ रौप्य आणि ६ कांस्य पदकांवर महाराष्ट्राला समाधान मानावे लागले.वैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा खेळाडू गिरीश जकाते  ( सांगली ) याला सुवर्णपदक मिळाले. क्रीडा व युवक संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर,सोलापूर शहर व जिल्हा तसेच महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त  विद्यमाने आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यांने केगाव येथील सिंहगड इंस्टीट्युटच्या कॅम्पसमध्ये गेल्या तीन दिवसांपासून १९ वषार्खालील राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा सुरू होत्या.सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय खेळाडू, सुवर्णपदक विजेते,महाराष्ट्राचे प्रशिक्षक अजिंक्य दुधारे , सिंहगडचे प्राचार्य डॉ.एस.डी. नवले,सोलापूर जिल्हा कुस्ती संघटनेचे सचिव भरत मेकले आणि जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी आणि मेडल प्रदान करण्यात आले.मुलांमध्ये पंजाबला सर्वसाधारण विजेतेपद, महाराष्ट्राला उपविजेतेपद तर हरियाणा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.मुलींमध्ये चंदीगडला सर्वसाधारण विजेतेपद,पंजाबला उपविजेतेपद आणि हरियाणाला तिस?्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.याशिवाय वैयक्तिक परितोषिकेही देण्यात आली.प्रास्तविक भाषणात जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्पर्धा भरविण्यामागचा उद्देश सांगितला. स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले आणि त्यांच्या टीमचे नाईक यांनी आभारही मानले  यावेळी भारतीय तलवारबाजी असो.चे खजिनदार अशोक दुधारे,महाराष्ट्राचे सचिव डॉ.उदय डोंगरे,जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे,  सुजाण थॉमस,आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य दुधारे, निरीक्षक विकास पाठक , संघटनेचे राजेंद्र माने, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे,महिला प्रशिक्षक संगीता येवतीकर, आमसिध्द सोलनकर, बाळासाहेब बालटे , गणेश खंडागळे, जयश्री मदने-पाटील,उपप्राचार्य प्रकाश नवले,करीम मुजावर,किरण वायचळ,पवन भोसल,जुबेर शेख,नदीम शेख, अनिल देशपांडे,प्रमोद चुंगे, दशरथ गुरव,धर्मराज कट्टीमणी,हेमंत शेटे,सत्येन जाधव,शिवानंद सुतार ,राजू प्याटी,  देवेन्द्र कांबळे,  विनय जाधव यांच्यासह सिंहगडची टीम उपस्थित होती. सायली जाधव आणि शर्वरी ठोंगे यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.--------------------मुलांच्या "फॉइल,सेबर आणि ईपी क्रीडा प्रकारात - हरियाणा- २ सुवर्ण,तामिळनाडू १ रौप्य आणि १ कांस्य,महाराष्ट्र १ सुवर्ण,१रौप्य आणि ३ कांस्य,पंजाब २ सुवर्ण , ३ रौप्य आणि २ कांस्य, केरळ १ सुवर्ण, दिल्ली १ कांस्य, विद्याभारती १ कांस्य,जम्मू काश्मीर २ कांस्य , सिबीएसई १ रौप्य आणि तेलंगणाला १ रौप्य पदक मिळाले.--------------------------------------- मुलींमध्ये "हरियाणाला १ सुवर्ण,१ रौप्य आणि १ कांस्य,चंदीगड २ सुवर्ण आणि १ कांस्य,महाराष्ट्र ३ कांस्य, पंजाब १ सुवर्ण,२ रौप्य आणि १ कांस्य, विद्याभारतीला १ कांस्य, गुजरात १ कांस्य, तामिळनाडू १ रौप्य, मध्यप्रदेश ३ कांस्य,जम्मू काश्मीर १ सुवर्ण आणि केरळ राज्याने १ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावले.---------------------------------------सिंहगडमध्ये सर्वाधिक स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूटने आतापर्यंत भूमी अभिलेख पुणे विभाग स्पर्धा, ३५० खेळाडू,वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी ८०० खेळाडू,राज्यस्तरीय मुली हॅण्डबॉल ३०० खेळाडू, राष्ट्रीय शालेय मल्लखांब २०० खेळाडू आणि मागील तीन दिवसात ३५० खेळाडूंचा सहभाग असलेली ६३ वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पधेर्चे यशस्वी नियोजन करून क्रीडा क्षेत्राला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.सोलापुरात होणाºया स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यासाठी क्रीडा संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन सिंहगडचे संचालक संजय नवले यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSportsक्रीडा