Solapur: लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार

By रूपेश हेळवे | Updated: July 9, 2023 12:39 IST2023-07-09T12:38:45+5:302023-07-09T12:39:10+5:30

Solapur: सतरा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल बाबावाले ( रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Solapur: 17-year-old girl raped by luring her into marriage | Solapur: लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार

Solapur: लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार

- रुपेश हेळवे
सोलापूर  - सतरा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल बाबावाले ( रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडिता ही एका दुकानात कामाला होती. तेथेच पीडितेची आरोपी विशाल याच्याशी ओळख झाली. या ओळखीतून पीडिता ही आरोपीशी फोनमधून बोलत होते. दरम्यान, पीडितेला आरोपीने नोव्हेंबर २०२२ मध्ये पहाटे भेटण्यासाठी बोलवून पुणे रोडवर नेऊन तेथे पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तेव्हा आरोपी हा टाळाटाळ करू लागला. पीडितेने मैत्रिणीच्या मोबाईलवरून फोन केला असता आरोपीने माझे लग्न ठरले आहे, तू मला फोन करू नको, जर पून्हा फोन केल्यास तुझ्या आईला सांगेन अशी धमकी दिली, अशा अशायाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी विशाल बाबावाले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Solapur: 17-year-old girl raped by luring her into marriage