शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘चपाती डे’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:03 IST

संडे अँकर; आठवड्यातून एकवेळ गरजूंसाठी, आॅर्किडमध्ये विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून उपक्रम

ठळक मुद्देसमाजाचं आपण काही देणं लागतो या सामाजिक बांधिलकीच्या विचारातून हा अनोखा उपक्रमदररोज मुले येत असताना सोबत घरातूनच डब्यामध्ये एक चपाती एक्स्ट्रा आणतात आणि जवळपास तीनशे साडेतीनशे चपात्या सकाळी गोळा होतात

सोलापूर  : वेळ सकाळी पावणे नऊची.. स्थळ एन.के. आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर.. विद्यार्थी महाविद्यालयाच्या व्हॅनमधून.. कुणी बाईकवरुन कॉलेजला येत आहेत...  हे सर्व विद्यार्थी आपापल्या डिपार्टमेंटला जात असताना डिपार्टमेंटच्या  प्रवेशद्वाराजवळ स्वयंसेवक थांबलेले.. त्यांच्या हातात चपाती कलेक्ट करण्यासाठीची भांडी.. विद्यार्थी आपापल्या डब्यांमधून चपाती काढतात आणि स्वयंसेवकांकडे देतात. हे करताना त्यांच्या चेहºयांवरील आनंदाचे संमिश्र भाव खूप काही सांगून जाणारे. समाजासाठी आपणही काही देणं लागतो या भावनेतून आपला स्वत:चा खारीचा वाटा उचलतानाचे आनंदाचे भाव निश्चितच बरंच काही सांगून गेले. 

आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन अ‍ॅकॅडमिक प्रा. आय. आय. मुजावर यांना हा विचार सुचला.  समाजाचं आपण काही देणं लागतो या सामाजिक बांधिलकीच्या विचारातून हा अनोखा उपक्रम आॅर्किड अभियांत्रिकीमध्ये सुरू झाला आहे. दररोज मुले येत असताना सोबत घरातूनच डब्यामध्ये एक चपाती एक्स्ट्रा आणतात आणि जवळपास तीनशे साडेतीनशे चपात्या सकाळी गोळा होतात. 

जयहिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी, उपाध्यक्ष विक्रमसिंह बायस व आस्था फाउंडेशनचे जगदीश पाटील व डॉ. विक्रम कारंडे यांचे चपात्या गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे सहकार्य लाभले आहे. आश्रमशाळा, वृद्धाश्रम व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांबरोबर आलेल्या गरजू व्यक्तींना या चपात्या वाटप होताहेत.  ही एक चळवळ आहे. या चळवळीमध्ये प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलायचा आहे. आठवड्यातून  एक दिवस एक्स्ट्रा चपाती आणणं तसं अवघड नाहीये. सामाजिक उपक्रमातही वेगळेपण जपणारी अशी ही आॅर्किड संस्था या माध्यमातून चपाती डे हा उपक्रम समाजापर्यंत एक मोठा संदेश देणारी चळवळ ठरावी ही भावना आहे. 

सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यात हिरीरिने सहभागी होत आहेत. एक सेवाभावी उपक्रम म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. दिवसेंदिवस या उपक्रमाला प्रतिसाद वाढत आहे. अन्नदानातून आत्मिक समाधान मिळते यालाच आजच्या भाषेत हॅपिनेस कोशंट म्हणतात, असे प्रा. मुजावर यांनी सांगितले.

एक चपाती गरजूंसाठी‘चपाती डे’ हा उपक्रम आॅर्किड अभियांत्रिकीमध्ये सुरू झालाय. ‘एक चपाती’ गरजूंसाठी या माध्यमातून  आठवड्यातील एक दिवस प्रत्येक विभागास वाटून दिला आहे. त्या दिवशी त्या विभागातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी दररोजच्या डब्यामध्ये एक चपाती आणतात. ती त्याच दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत गोळा करायची असा हा उपक्रम आहे. 

‘चपाती डे’ हा एक सामाजिक उपक्रम आहे, हा उपक्रम आपण सहज राबवू शकतो. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथे तुम्हाला वाटेल त्या गरजूला तुम्ही घरातील ताजे अन्न देऊन तुम्ही हा उपक्रम साजरा करु शकता. वंचितांसाठी सामाजिक संवेदनेच्या भावनेतून हा उपक्रम केला आहे. असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येते.- डॉ. जे. बी. दफेदारप्राचार्य आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयSchoolशाळा