शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांकडून शिकण्यासारखं खूप काही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:20 IST

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. ...

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. तीन महिने त्यांच्यासोबत राहिलो. खूप गप्पा झाल्या. त्यांचा जीवनसंघर्ष समजून घेतला. देशभरातील विविध प्रांतातील बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि विविध रूढी, परंपरा, चालीरीती असणाºया आपल्या मुलामुलींचे सहजीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.

या मुलामुलींना आपणच बोट धरून जगणं शिकवलं. शिक्षण दिले. संस्कार दिले. आत्मविश्वास दिला. आज ही मुलं जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी स्वबळावर संघर्ष करू शकतात. आज आपले नेमके उलट झाले आहे. आॅस्ट्रेलियातील नियम, शिस्त आणि सार्वजनिक गोष्टींची माहिती आणि सवय नसल्यामुळे आम्हीच त्यांचे बोट धरून चालतोय. त्यांनी दाखविलेले आधुनिक जग पाहून डोळे दिपून गेले. त्यांचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर ही मुलं केव्हाच आपलं बोट सोडून स्वतंत्र झाल्याची जाणीव झाली. आम्हालाच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकाव्या लागतात.

जग झपाट्याने बदलतंय. त्यामुळे जागतिक स्पर्धेत उतरल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे चांगल्या नोकºया कमी, याउलट जगभरात शिक्षण, कौशल्ये, क्षमता असणाºयांना बोलावून संधी मिळते. यामुळेच आपली मुलं देश सोडून आॅस्ट्रेलियात आणि जगभर स्थिरावली. तरीही त्यांच्यामध्ये ‘आमची माती आमची माणसं’ ही भावना अजूनही दिसते. त्यांनी देश सोडल्यामुळे होणाºया टीकेविषयी त्यांचे म्हणणे असे की, आपले सामर्थ्य जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडलेला सकारात्मक मार्ग आहे.

जागतिकीकरण आणि ‘ग्लोबल व्हिलेज’च्या वातावरणामुळे देशाबाहेरची नोकरी आणि जगण्यासाठी करावा लागणारा आमचा ‘स्ट्रगल’ न पाहता, आमची बाजू न ऐकता एकतर्फी केली जाणारी टीका अयोग्य आहे, अशी त्यांची तक्रार दिसते. नोकरी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा देशप्रेम जोपासत त्यांनी स्वत:ला घडविले. सक्षम बनविले. खूप कठीण परिस्थितीला सामोरे जात बदल स्वीकारले, यासाठी त्यांचे कौतुक झाले पाहिजे. वर्तमानात जगणारी, प्रचंड आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द असणारी आपली ही तरुणाई जगभरात यशस्वी होताना दिसते. 

उलट ही मुलं घरातल्या, बाहेरच्या, सगळ्यांच्या टीकेचे धनी झाले. भारतात होतो तेव्हा आमच्या नोकरीविषयी कुणीच बोलत नव्हते. त्यामुळे जागतिक स्पर्धा आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता देश सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही आनंदाने घरदार, देश सोडून आलो नाही. आईवडिलांनी शिकवून मोठे केले, तरीही बेकार फिरल्यामुळे त्यांच्या चेहºयावरची काळजी दूर करण्यासाठी आम्हाला ही किंमत मोजावी लागली. इतक्या कठोर शब्दात व्यथा मांडणाºया आपल्या मुलांमध्ये दिसलेले सर्वांगीण बदल आमच्यासाठी खूपच नवीन होते. वस्तुस्थिती आणि परिस्थितीचे अचूक आकलन, समाजभान, जबाबदार वृत्ती, कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर अशा आपल्या मुलांमधील गुणांचे इकडे भरपूर कौतुक होताना पाहिले.

मनापासून समाधान वाटले. त्यांचे राहणीमान उंचावले. जीवनशैली बदलली तरीही आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींचे जतन करीत उत्तम समतोल राखतात. आपल्या मुलामुलींनी स्वत:ला सिद्ध केल्यामुळे भारतीयांची प्रतिमा उंचावली आहे. सतत कार्यमग्न राहणाºया या मुलांची तडजोडीची, स्पर्धेची, नवख्या माणसाशी देखील जुळवून घेण्याची तयारी पाहून थक्क झालो. ‘गॉसिपिंग’मध्ये वेळ घालविण्यापेक्षा ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘उत्पादक’ गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो. स्पर्धेत झोकून देऊन जिंकण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची वाटली. इथल्या काहीच न करता वांझोटी टीका करीत रडत बसणाºयांविषयी त्यांना बिलकूल आस्था वाटत नाही. म्हणून स्वकर्तृत्वावर पुढे जाण्याची जिद्द हेच बलस्थान असलेल्या आपल्या मुलांकडून जे शिकण्यासारखे आहे ते शिकायला काय हरकत आहे.- प्रा. विलास बेत (मेलबॉर्न आॅस्ट्रेलिया) (लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा