सोलापुरातील लोधी गल्लीतील चाळीतून सहा तलवारी, कुकरी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 14:36 IST2018-11-13T14:34:03+5:302018-11-13T14:36:28+5:30

सोलापूर : लोधी गल्ली येथील नवीन तालमीजवळील नवीन चाळीत बेकायदेशीर जमविलेला हत्यारसाठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी ...

Six swords, cookery seized from a chawl in Lodhi lane in Solapur | सोलापुरातील लोधी गल्लीतील चाळीतून सहा तलवारी, कुकरी जप्त

सोलापुरातील लोधी गल्लीतील चाळीतून सहा तलवारी, कुकरी जप्त

ठळक मुद्देछाप्यात सहा तलवारी व एक कुकरी असा अवैध शस्त्रांचा साठागुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने हा शस्त्रसाठा जप्त केलाशस्त्रे अवैधपणे बाळगल्याप्रकरणी किसनसिंग कल्याणसिंग धनीवाले याला ताब्यात घेतले

सोलापूर : लोधी गल्ली येथील नवीन तालमीजवळील नवीन चाळीत बेकायदेशीर जमविलेला हत्यारसाठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

किसनसिंग कल्याणसिंग धनीवाले (रा. ३९, उत्तर सदर बझार, लोधी गल्ली, सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. नवीन चाळीतील एका घरात बेकायदेशीर हत्याराचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना  मिळाली. या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी माहितीची शहानिशा करण्यासाठी त्या परिसरातील वावर गुप्तपणे वाढविला. जेव्हा शस्त्र असल्याची माहिती पक्की झाली. तेव्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संपूर्ण तयारीसह सोमवारी छापा मारला. 

छाप्यात सहा तलवारी व एक कुकरी असा अवैध शस्त्रांचा साठा मिळून आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने हा शस्त्रसाठा जप्त केला. ही  शस्त्रे अवैधपणे बाळगल्याप्रकरणी किसनसिंग कल्याणसिंग धनीवाले याला ताब्यात घेतले असून ही हत्यारे कोठून आली, कोणी आणली आणि कोणत्या उद्देशाने ही शस्त्रे बाळगण्यात आली आहेत, याची चौकशी केली जात आहे. याशिवाय शस्त्राचा उपयोग करून दुष्कृत्य करण्याचा कोणता मनसूबा होता का, हेही तपासून पाहिले जात ओ.

ही कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बापूसाहेब बांगर, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार, सहायक फौजदार दगडू राठोड, पोहेकॉ. संजय बायस, पोना. राकेश पाटील, शंकर मुळे, पोकॉ. वसंत माने, स्वप्निल कसगावडे, सोमनाथ सुरवसे, उमेश सावंत, सागर गुंड यांनी पार पाडली. 

Web Title: Six swords, cookery seized from a chawl in Lodhi lane in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.