फेस्टिव्हल पाहून निघालेले सहा जण पंचवटीजवळ टिपरच्या धडकेत जखमी

By काशिनाथ वाघमारे | Updated: December 6, 2023 01:08 IST2023-12-06T01:06:57+5:302023-12-06T01:08:31+5:30

यातील तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, तर किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

Six persons who had gone to see the festival were injured in a collision with a tipper near Panchavati | फेस्टिव्हल पाहून निघालेले सहा जण पंचवटीजवळ टिपरच्या धडकेत जखमी

फेस्टिव्हल पाहून निघालेले सहा जण पंचवटीजवळ टिपरच्या धडकेत जखमी

सोलापूर : माळीनगर (ता. माळशिरस) येथील फेस्टिव्हलला जाणाऱ्या-येणाऱ्या तीन मोटारसायकलीवरील सहाजणांना पंचवटीनजीक एका टिपरेने धडक दिल्याने तीनजण गंभीर जखमी, तर तिघे किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली.

यातील तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, तर किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज मंगळवारी रात्री साहिल बाळासाहेब कांबळे (वय १७), आदित्य दत्तात्रय लांडगे व राजू शंकर लांडगे (३०, सर्व रा. फलट) हे माळीनगर येथे फेस्टिव्हल पाहण्यास मोटारसायकल (एम.एच.१२/ ई. ६३३८) व (एम.एच ४५/ ए. एम. २०००) वरून निघाले होते, तर एम.एच.४५/ जी. २४५८ क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन जावेद अमीन इनामदार (वय ४०), गणेश कुमार भंडारे (२५ ) व अनोळखी एकजण फेस्टिव्हल पाहून परतताना पंचवटी येथील सुलतान बाबा यांच्या समाधिस्थळासमोर नंबर नसलेल्या एका टिपरेने त्यांना धडक दिली. अपघातात साहिल कांबळे, आदित्य लांडगे व राजू शंकर लांडगे हे गंभीर जखमी झाले, तर जावेद इनामदार, गणेश भंडारे व अनोळखी एकजण किरकोळ जखमी झाले.

गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर किरकोळ जखमी जावेद इनामदार व गणेश भंडारे या दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

Web Title: Six persons who had gone to see the festival were injured in a collision with a tipper near Panchavati