शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सोलापुरातील 'कोरोना' बाधित रुग्णांच्या नवसंजीवनीसाठी 'मदर' च्या भूमिकेत 'सिस्टर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 08:45 IST

जागतिक परिचारिका दिन विशेष; अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचरिकांना 'सलाम'

ठळक मुद्देपरिचारिका दिनानिमित्त आज सोलापुरात विविध कार्यक्रमपरिचारिकांच्या कार्याला सलाम देण्यासाठी संस्था, संघटना एकवटल्या

शितलकुमार कांबळे

माणूस अंथरूणाला खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे दुरावतात. अशावेळी रक्ताचे कुठलेही नाते नसताना आणि कोणत्याची नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपलं म्हणून साथ देते. औषध देते. मानसिक आधारही तीच देते. काही सांगावेसे वाटले तर ऐकणारीदेखील तीच असते. अशा या जिवाभावाच्या ‘सिस्टर’ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम !-----------------------------------------

कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कोरोनाशी दोन हातवैद्यकीय सेवा क्षेत्रात परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशिवाय, या सेवेला पूर्णत्व मिळू शकत नाही. एकीकडे कामाचे वाढणारे तास, रुग्णांची सेवा करताना येणारा मानसिक ताण, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाºया अशा या सर्व बाजू त्या भक्कमपणे सांभाळत आहेत. कोरोना आजारामुळे परिचारिकांचे महत्व अधिक वाढले आहे. रुग्णांची काळजी घेताना रुग्णाकडून इतरांची सुरक्षा करणे तसेच स्वत:ला विषाणूपासून दूर ठेवण्याची कसरत त्यांना कळावी लागते. डॉक्टरांपेक्षा रुग्णांना सोबत या परिचारिकांचीच मिळते.

सध्या कोरोना आजाराचे वाढते स्वरुप पाहता त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. रुग्णांची सेवा करतानाच आपल्या कुटुंबियांना याची लागण होऊ  नये याची दक्षता घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यात येतात. आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाºया या परिचारिका एक महिना आपल्या कुटुंबियांपासून दूर राहतात. आयसोलेशन वॉर्डमधील काम संपल्यानंतर पुन्हा क्वारंटाईन होतात. या दरम्यान फोनद्वारेच कुटुंबियांशी संवाद साधता येतो. कोरोना वॉर्डात काम करताना काही वेळा त्यांच्या घरातूनही विरोध होतो. कुटुंबियांना समजावून प्रसंगी विरोध पत्करुन ते रुग्णांची सेवा करत आहेत.----------------------------–------------पाणीही पिता येत नाहीपीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वापमेंट ) परिधान केल्यानंतर सहा तास पाणीही पिता येत नाही. हे किट डोक्यापासून पायापर्यंत असल्याने घामाच्या धारा येतात. जेव्ही किट काढतो, तेव्हाच बरे वाटते, असा किट परिधान केल्यानंतरचा अनुभव एका परिचारिकेने सांगितला.----------कोरोना वॉर्डामध्ये रुग्णांची काळजी घेण्यासोबतच त्यांना सकस आहार देते. येथे काम करत असल्याने काही दिवस घरच्या जबाबदाºया पार पाडता आल्या नाहीत. मला तीन मुले आहेत. त्यांच्या जेवणाचा थोडा त्रास झाला. हॉटेलही बंद असल्याने फक्त मॅगी, खिजडी, दूध, फळे असे एक महिनाभर ते खात होते.  - रुथ कलबंडी, अधिसेविका, सिव्हील हॉस्पीटल--------------------------------

माझ्या आई बाबांना कोरोना आजाराविषयी माहीती मिळाली. ते गाबरले. त्यांनी कोरोना वॉर्डात काम करु नको असे बजावले.  पीपीई कीट घातल्यानंतर कसे सुरक्षित राहतो हे त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी ते ऐकले. मला पाच महिण्याचा मुलगा आहे. या काळात त्याला मी फक्त दुरुनच पाहिले     - महेश महामुनी, अधिपरिचारक, सिव्हील हस्पीटल

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस