Shrikanchana Yannam, BJP's mayor of Solapur Municipal Corporation | सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम

ठळक मुद्दे- महापालिकेच्या सभागृहात झाली महापौरपदाची निवडणूक- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवडणुक निर्णय अधिकाºयाचे काम पाहिले- महापौर निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम याची निवड करण्यात आली़ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काम पाहिले.

दरम्यान, महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम निवडून आल्या. विशेष म्हणजे शिवसेना आणि बसपाच्या सदस्यांनी भाजपला साथ दिली. यन्नम यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या सारिका पिसे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल, एमआयएमच्या शाहजिदाबानो शेख यांनी अर्ज दाखल केला होता. पिसे, पटेल यांनी माघार घेतली. यन्नम यांना ५१ मते तर  एमआयएमच्या शेख यांना ८ मते मिळाली. १०२ सदस्य  असलेल्या महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ४९ सदस्य आहेत. महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या एका आणि बसपाच्या एका सदस्याने भाजपला मतदान केले.

Web Title: Shrikanchana Yannam, BJP's mayor of Solapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.