धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 17:56 IST2022-06-03T17:56:38+5:302022-06-03T17:56:45+5:30

श्रीशैल गजानन सारोळे (वय २४, रा. हनुमान नगर, मंद्रुप) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Shocking; Young man dies of shock while charging mobile; Incidents in South Taluka | धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना

धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमधील हनुमान नगरातील राहत्या घरात मोबाईल चार्जिंगला लावत असताना, वायर हाताला लागून शॉक बसून तरुणाचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रकार गुरुवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.

श्रीशैल गजानन सारोळे (वय २४, रा. हनुमान नगर, मंद्रुप) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीशैल सारोळे हा सकाळी झोपेतून उठला व त्याचा मोबाईल घरातील इलेक्ट्रिक बोर्डाला लावत होता. चार्जिंग लावत असताना बोर्डावरून बाहेर दिलेल्या कनेक्शनच्या वायरला पिन नव्हती. त्यातील एक वायर स्वीचमधून निघून श्रीशैल सारोळे याच्या हातावर पडली. वायर हातावर पडल्याने इलेक्ट्रिक शॉक बसला. श्रीशैल सारोळे हा जमिनीवर पडला अन् जखमी झाला. त्याला उपचारासाठी मंद्रुप येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान श्रीशैल सारोळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, तपास सहायक फौजदार कांबळे करीत आहेत.

Web Title: Shocking; Young man dies of shock while charging mobile; Incidents in South Taluka